शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

दोन हजार प्राणी, पक्ष्यांचा वाहनांखाली चिरडून मृत्यू

By admin | Updated: June 5, 2014 00:04 IST

नऊ वर्षांचे निरीक्षण : पंचवीस कि.मी.त गमावले जीव

संजय पाटील ल्ल कºहाड अन्नसाखळीतील महत्त्वाचे घटक असणार्‍या प्राणी, पक्ष्यांना मानवनिर्मित कारणांमुळे आपला जीव गमवावा लागतोय. पिकांवरील औषध फवारणी, नष्ट होणारी वसतिस्थाने, शिकार आदी कारणास्तव प्राणी, पक्ष्यांवर मृत्यू ओढवतोय. त्याचबरोबर वाहनांच्या धडकेतही दरवर्षी शेकडो प्राणी-पक्षी मृत्युमुखी पडतायत. एम. एन. रॉय अनौपचारिक शिक्षण व संशोधन संस्थेने सर्व्हेतून हा निष्कर्ष मांडलाय. वेगवेगळ्या मार्गांवर वाहनांखाली चिरडून प्राणी, पक्ष्यांना जीव गमवावा लागतो. संस्थेने याची दखल घेत नोंदी करण्यास सुरूवात केली. संस्थेच्या पर्यावरण विभागाचे संचालक सुधीर कुंभार यांनी २००२ सालापासून हे काम हाती घेतले. सर्व्हेसाठी त्यांनी कºहाड ते ढेबेवाडी या २५ कि़ मी. रस्त्याची निवड केली. दररोज सकाळी व सायंकाळी या मार्गावरून त्यांचा प्रवास सुरू झाला. प्रवासातच वाहनाच्या धडकेत मृत्युमुखी पडलेल्या पक्षी, प्राण्याची नोंद करणे, छायाचित्र घेणे व या नोंदी एका वहीत संकलित करून वर्षाअखेरीस त्याचे वर्गीकरण करण्याचे काम डॉ. सुधीर कुंभार यांनी केले. डॉ. कुंभार यांच्यासह अल्केश ओहळ, डॉ. संदेश कांबळे, सुहास पाटील, डी. एम. पाटील, आर. डी. पाटील हे सहाजण २५ कि़ मी. च्या अंतरात दररोज निरीक्षण करून त्याची एकत्रित नोंद ठेवतात. नोंदीनुसार कºहाड-ढेबेवाडी मार्गावर जुलै २००५ ते जुन ०६ अखेर १११ प्राणी व ३९ पक्षी, २००६-०७ अखेर १४५ प्राणी व ५३ पक्षी, २००७-०८ अखेर १७४ प्राणी व ६७ पक्षी, २००८-०९ अखेर १९६ प्राणी व ५५ पक्षी, २००९-१० अखेर १६० प्राणी व ५७ पक्षी, २०१०-११ अखेर १८९ प्राणी व ६२ पक्षी, २०११-१२ अखेर १४८ प्राणी व ५२ पक्षी, २०१२-१३ अखेर १७८ प्राणी व ६४ पक्षी, जुलै २०१३ ते आजअखेर १४० प्राणी व ५१ पक्ष्यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. म्हणजेच गेल्या नऊ वर्षांत वाहनाखाली सापडून १ हजार ४४१ प्राणी व ५०० पक्ष्यांना मृत्यू पत्करावा लागलाय.