शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

‘त्या’ महिला पोलिसाचा निवडणूक आयोगाकडून गौरव

By admin | Updated: February 17, 2017 22:43 IST

प्रशस्ती पत्रक : पालिका निवडणुकीवेळी मतदान केंद्रावर चरेगावकरांसोबत झटापट

म्हसवड : कऱ्हाड नगरपालिका निवडणुकीत मतदार केंद्रावर आलेले राज्य सहकारी परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांना एका महिला कॉन्स्टेबलने रोखले होते. त्यानंतर झालेल्या वादावादीची चित्रफीत सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यात एका महिला कर्मचाऱ्याच्या धाडसाचं कौतुकच झालं. आता राज्य निवडणूक आयोगानंही याची दखल घेऊन शाबासकी देणारे पत्र पाठविले आहे.याबाबत माहिती अशी की, सातारा जिल्ह्यातील पालिकांसाठी २७ नोव्हेंबरला मतदान झाले. मतदानावेळी कऱ्हाड येथील एका मतदान केंद्रात राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर आपली गाडी घेऊन जात होते. त्यावेळी त्या मतदान केंद्रावर कर्तव्य बजावत असलेल्या व कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात कामास असलेल्या व मूळच्या माण तालुक्यातील पळशी येथील असलेल्या महिला पोलिस कॉन्स्टेबल दया अर्जुन डोईफोडे यांनी चक्क चरेगावकर यांना मतदान केंद्रात जाण्यापासून अडवलं. त्यावेळी चरेगावकर ऐकण्याच्या तयारीत नव्हते. वास्तविक पाहता मतदान केंद्राच्या शंभर मीटरच्या आत वाहन नेण्यास मनाई असते. मात्र, ‘मी मंत्री आहे, माझ्या गाडीला निवडणूक आयोगाच्या परवानगीचा परवाना लावण्यात आला आहे,’ असा दावा चरेगावकर यांनी केला होता. मात्र, महिला पोलिस कॉन्स्टेबल डी. ए. डोईफोडे या नियम समजावून सांगत होत्या. पण त्यांचं कुणीही ऐकून घ्यायला तयार नव्हतं. उपस्थित अधिकाऱ्यांनीही कानाडोळा केला होता. या घटनेचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, हे प्रकरण मीडियाने उचलून धरले. यानंतर निवडणूक आयोगाने या प्रकरणाची दखल घेऊन, महिला पोलिस कॉन्स्टेबल डोईफोडे यांना राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य सचिव डॉ. एस. एम. चन्ने यांनी एक पत्र पाठवून कर्तव्य दक्षतेबाबत कौतुक केलं आहे. आता सोशल मीडियावरून हे पत्रही व्हायरल होत आहे. यामुळे माण तालुक्यात सर्वत्र याचीच चर्चा रंगत आहे. (प्रतिनिधी)कऱ्हाड पालिका निवडणुकीत मी केवळ माझे कर्तव्य पार पाडले. त्यानंतर कोणाचाही त्रास झाला नाही. परंतु त्यानंतर सोशल मीडिया अन् आता राज्य निवडणूक आयोगानं माझ्या कामाची दखल घेऊन कौतुक केलं. याचा आनंद वाटतो.- दया डोईफोडे, महिला पोलिस कॉन्स्टेबल, कऱ्हाड पोलिस ठाणे