शहरं
Join us  
Trending Stories
1
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
2
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
3
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
4
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
5
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
6
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
7
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
8
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
9
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!
10
धुळ्यातील जोडपे कोकणात फिरायला आले अन् चिपळूणमधील वशिष्ठी नदीत मारल्या उड्या
11
निखिल रविशंकर यांच्या हाती एअर न्यूझीलंडची धुरा; कोण आहेत ते? जाणून घ्या अधिक माहिती
12
शौचालयात गेलेला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!
13
Sheetala Saptami 2025: आज रात्री थोडा जास्तच स्वयंपाक करा, कारण उद्या आहे शितला सप्तमी!
14
PM मोदींवर कारवाई करण्यास निवडणूक आयोगाची टाळाटाळ, हायकोर्टात जाणार- पृथ्वीराज चव्हाण
15
रतन टाटांच्या कंपनीचे शेअर्स आपटले! बँक निफ्टीही घसरला! पण L&T ने घेतली भरारी!
16
दिग्गज शास्त्रज्ञ आइन्स्टाईन यांचा जगप्रसिद्ध प्रयोग चुकीचा होता; MIT च्या शास्त्रज्ञांनी केलं सिद्ध!
17
निवृत्तीच्या २ दिवस आधी दया नायक यांना ACP पदावर बढती, गुरुवारी होणार रिटायर
18
Health Tips: मांड्यांचा आतला भाग काळवंडलाय? करा डॉक्टरांनी सांगितलेला घरगुती उपाय
19
'काळजीपूर्वक ऐका, मोदी-ट्रम्प यांनी चर्चा केली नाही'; राज्यसभेत एस जयशंकर संतापले
20
England Playing XI 5th Test : इंग्लंडला मोठा धक्का; या कारणामुळे कर्णधार बेन स्टोक्स प्लेइंग इलेव्हनमधून OUT

पस्तीस ग्रामपंचायती बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 00:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : जिल्ह्यातील ३१९ पैकी ३५ ग्रामपंचायतींची निवडणूक पूर्णत: बिनविरोध झाल्याचे गुरुवारी अर्ज माघारीनंतर स्पष्ट झाले. रात्री दहा वाजेपर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार इतरही काही ग्रामपंचायती बिनविरोध करण्याचे प्रयत्न लोकप्रतिनिधींच्यामार्फत सुरू होते.सातारा तालुक्यातील करंजे तर्फ परळी, न्हाळेवाडी, कामेरी, गोगावलेवाडी, माळ्याचीवाडी, खावली, भरतगाववाडी, रेणावळे, मत्त्यापूर या नऊ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : जिल्ह्यातील ३१९ पैकी ३५ ग्रामपंचायतींची निवडणूक पूर्णत: बिनविरोध झाल्याचे गुरुवारी अर्ज माघारीनंतर स्पष्ट झाले. रात्री दहा वाजेपर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार इतरही काही ग्रामपंचायती बिनविरोध करण्याचे प्रयत्न लोकप्रतिनिधींच्यामार्फत सुरू होते.सातारा तालुक्यातील करंजे तर्फ परळी, न्हाळेवाडी, कामेरी, गोगावलेवाडी, माळ्याचीवाडी, खावली, भरतगाववाडी, रेणावळे, मत्त्यापूर या नऊ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. नित्रळ ग्रामपंचायतीसाठी अर्जच दाखल झाला नसल्याने या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमावा लागणार असल्याचे तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण यांनी सांगितले. तसेच उर्वरित २८ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होणार आहे. आसगावात सरपंचपदासाठी व वॉर्ड ३ मध्ये सदस्यपदासाठी, बेंडवाडीत केवळ सरपंचपदासाठी, कोंढवलीत सरपंच व वॉर्ड क्रमांक १ मध्ये, तसेच केळवलीत केवळ सरपंचपदासाठी निवडणूक होणार आहे.कोरेगाव तालुक्यातील ५१ पैकी ५ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. अंबवडे संमत कोरेगाव, खडखडवाडी, सायगाव पुनर्वसित, शेल्टी, अनबनवाडी, रामोशीवाडी, खामकरवाडी, दिघेवाडी, जगतापवाडी, कवडेवाडी, न्हावी बुद्रुक, वेलंग (शिरंबे), मोरबेंद या १३ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. उर्वरित ३८ ग्रामपंचायतींमध्ये तिरंगी अथवा चौरंगी लढत होणार आहे. वडाचीवाडी, भावेनगर, बनवडी येथील सर्व सदस्य बिनविरोध झाले. मात्र, या तिन्ही गावांमध्ये सरपंचपदासाठी निवडणूक होणार आहे.माण तालुक्यातील तीस पैकी सहा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. बिदाल, दीडवाघवाडी, पूळकोटी, अनभुलेवाडी, दीवड, पळशी या सहा ग्रामपंचायतींचा बिनविरोधमध्ये समावेश आहे. बनगरवाडी, चिलारवाडी, पळशी सरपंचपद बिनविरोध झाले आहे. महाबळेश्वर तालुक्यातील६ ग्रामपंचायतींपैकी रामेघर, लाखवडी, खामील चोरगे, रुळे, व्यंगळे याग्रामपंचायती बिनविरोध झाल्या, तरगोगवे या एकमेव ग्रामपंचायतीचीनिवडणूक होणार आहे. वाई तालुक्यात ७ तर खंडाळ्यात असवली व शिरवळ या दोन मोठ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत काट्याची टक्कर होणार आहे.फलटण तालुक्यांमध्ये प्रशासनाची उशिरापर्यंत अर्ज माघारीची मोजदाद सुरू होती. निवडणूक यंत्रणेने कोणतीही माहिती देताना अत्यंत गोपनीयता पाळल्याने उशिरापर्यंत या तालुक्यांतील माहिती मिळू शकली नाही.खटाव तालुक्यातील पंधरापैकी मरडवाक व भूषणगड ग्रामपंचायत बिनविरोध झाली. १९६ सदस्यांपैकी ३६ सदस्य बिनविरोध झाले. १६० सदस्य निवडीसाठी सोमवार दि. १६ रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे.कºहाड तालुक्यातील ४४ पैकी सात सरपंच तसेच ८१ सदस्यांचीही बिनविरोध निवड झाल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले. सरपंचपदासाठीच्या ६२ उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतले. सदस्यपदासाठी अर्ज दाखल केलेल्या ३३६ उमेदवारांनी आपले अर्ज काढून घेतले.