शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

आदर्कीत चाळीस वर्षांनंतर महापूर

By admin | Updated: September 25, 2016 00:52 IST

परतीच्या पावसाने झोडपले :

पुलाचा भराव १०० फूट वाहून गेला; आदर्की, सावतानगर पठाण वस्तीचा संपर्क तुटला आदर्की : आदर्की खुर्द, आदर्की बुद्रुक, आळजापूर, कापशी, बिबी, सासवड, हिंगणगाव परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली तर आदर्कीच्या ओढ्याला महापूर येऊन शेतात व पाणीपुरवठा विहिरीत पुराचे पाणी शिरले. आदर्की खुर्द गावात येणाऱ्या पुलाचा भराव १०० फूट वाहून गेल्याने मोठ्या वाहनांना रस्ता बंद झाला. आदर्की परिसरात मुसळधार पावसाने नालाबांध, पाझर तलाव, सिमेंट बंधारे ओसंडून वाहिले. पावसामुळे खरीप हंगामातील बाजरी, मूग, घेवडा, मका पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आदर्की खुर्द-हिंगणगाव ओढ्याला ४० वर्षांत पहिल्यांदाच महापूर आल्यामुळे शेतकरी वर्गाच्या शेतातील विहिरीत पाणी शिरले. तर ग्रामपंचायत आदर्की खुर्दच्या दोन पाणीपुरवठा विहिरीत पाणी शिरले. आदर्की खुर्द गावात येणाऱ्या पुलावरून तीन फूट पाणी वाहत असल्याने गावाचा दोन तास संपर्क तुटला होता. रात्री उशिरा पाणी कमी झाल्यानंतर १०० फूट भराव वाहून गेल्याने दुपारी वाहतूक सुरू केली व मोठ्या वाहनांना रस्ता बंद करण्यात आला. आदर्की बुद्रुक गावच्या हद्दीमधील पठाण वस्ती, कदम वस्तीवर जाणारा पूल व सावतानगर, बोडके वस्तीकडे जाणाऱ्या पुलावरून पाणी वाहत असल्याने दोन तास संपर्क तुटला होता. आळजापूर परिसरातील पाणी धोम-बलकवडी कालव्यात शिरल्याने कापशी-सासवड ओढ्याला पाणी सोडल्याने कापशी गावात जाणारा रस्ता काहीकाळ बंद होता. मुसळधार पावसाने शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विहिरीचे पाणी न वापरण्याचे आवाहन रात्री ९ वाजता मंडल अधिकारी विनोद सावंत, तलाठी डी. एस. क्षीरसागर, ग्रामसेवक बी. बी. लोणार, पोलिस पाटील महेश निंबाळकर यांनी पुलाची पाहणी केली. ग्रामस्थशंना पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत पुराचे पाणी शिरल्याने ग्रामस्थांनी विहिरीचे पाणी दूषीत झाले आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी विहिरीचे पाणी पिण्यासाठी वापरू नये, असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.