शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

तेरा किलोमीटरमध्ये तीस ठिकाणी धोका!

By admin | Updated: July 4, 2015 00:04 IST

ढेबेवाडी मार्गाची वाट बिकट : फरशी पुलांना नाहीत संरक्षक कठडे; धोक्याची सूचना देणाऱ्या फलकांचीही वानवा; प्रवाशांचा जीव मुठीत

गणेश काटेकर - कुसूर -कऱ्हाड-ढेबेवाडी मार्गावरील लहान-मोठ्या ओढ्यांवर बांधण्यात आलेल्या पुलांची दयनीय अवस्था झाली आहे. पुलाशेजारी वाढलेल्या गवत झुडपांमुळे कमी उंचीचे संरक्षक कठडे पूर्ण झाकून गेले आहेत. एकाही ठिकाणी पूलदर्शक फलक लावले नसल्याने नेहमीचीच लहान-मोठ्या अपघाताची मालिका सुरू आहे. परिणामी संबंधित विभागाने पूलदर्शक फलक व कठड्यांची दुरुस्ती करण्याची मागणी वाहनधारकांमधून होत आहे. कऱ्हाड-ढेबेवाडी मार्गावरील तारुख ते ढेबेवाडी फाटा या १६ किलोमीटरच्या अंतरामध्ये तारुख येथील पूल सोडला तर एकाही पुलाला संरक्षक कठडा बांधण्यात आलेला नाही. लहान-मोठ्या ओढ्यांवर पूल बांधण्यात आले असले तरी काही पुलांना संरक्षण कठडेच बांधण्यात आलेले नाहीत. तर काही पुलांच्या संरक्षण कठड्यांची उंची फक्त अर्धा ते एक फूट एवढीच आहे. काही पुलांचे कठडे तुटले असल्यामुळे धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. पूलदर्शक फलक एकाही ठिकाणी लावले नसल्यामुळे वारंवार अपघात होत आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी गवत-झुडपांमुळे कमी उंचीच्या पुलाचे संरक्षक कठडे पूर्णत: झाकून गेले आहेत. उंच वाढलेल्या गवतामुळे पूल असल्याचे वाहन चालकाच्या दिवसाही निदर्शनास येत नाही. तसेच वळणावरही रिफ्लेक्टर दिवे लावण्यात आले नसल्यामुळे रात्रीच्या वेळी अनेक वाहने रस्त्यावरून खाली गेल्याच्या घटना घडल्या आहेत.