शहरं
Join us  
Trending Stories
1
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
2
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
3
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
4
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
5
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
6
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
7
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
8
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
9
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
10
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
11
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
12
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
13
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
14
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
15
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
16
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
17
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
18
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
19
युनूस सरकार बघ्याच्या भूमिकेत; ढाक्यात हिंदू व्यावसायिकाची निर्घृण हत्या; हल्लेखोर मृतदेहावर नाचले
20
रस्त्याने जात असताना कारवर पडले दगड, भयंकर भूस्खलनातून थोडक्यात बचावले माजी मुख्यमंत्री

हातपंप भागवतायत नागरिकांची तहान!

By admin | Updated: May 4, 2016 21:33 IST

चोवीस तास पाणी : पालिकेची योजना अद्यापही अपूर्णच; पाणपोईसोबत तहानलेल्यांना कूपनलिकांचाही आधार

कऱ्हाड : शहरातील लोकांना शुद्ध व नियमितपणे पाणी मिळावे यासाठी नगरपालिकेकडून येथील बारा डबरी परिसरात चोवीस तास पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू करण्यात आले. मात्र, ते अद्यापही पूर्ण झालेले नाही. तर जुन्याच योजनेवर शहरात पाणीपुरवठा हा केला जातोय. शहरात अनेकवेळा काही कारणांनी पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यास नागरिकांना कूपनलिकांमधून थंडगार पाणी घ्यावे लागते. शहरातील या कूपनलिका आजही चोवीस तास पाणी देत आहेत.कऱ्हाड शहरासह वाढीव त्रिशंकू भागातील लोकांची पाण्याची समस्या दूर व्हावी म्हणून कऱ्हाड नगरपालिकेने शहराच्या ठिकठिकाणी कूपनलिका बसविल्या. भूगर्भातून पाईपच्या माध्यमातून हाताच्या दाबाने पाणी वर काढता यावे अशा पद्धतीने कूपनलिकांची रचना करण्यात आली. त्याचा वापर आजही खेडोपाडी नियमित केला जातो. तर शहरातही पालिकेच्या वतीने कूपनलिका बसविण्यात आलेल्या असून, त्यांना चोवीस तास पाणी आहे. शहरातील विविध ठिकाणी बसविण्यात आलेल्या कूपनलिकांतून चोवीस तास शुद्ध पाणी मिळत असल्याने कधीकाळी पाणी न आल्यास शहरातील नागरिक व महिला या कूपनलिकांचाच आधार घेतात. कऱ्हाड शहरात १२८ कूपनलिका आहेत. तर शहर ग्रामीण भागात ५१ हातपंप आहेत. चोवीसहून अधिक ठिकाणी दुरवस्थेत असलेल्या काही कूपनलिकांमध्ये पाणीच नाही. तर काहींमध्ये पाणी आहे. परंतु त्यांची अवस्था चांगली नाही. त्याची दुरुस्ती केल्यास त्यातून पाणी मिळू शकते. शाहू चौक येथे पाण्याची बोरिंग आहे. त्यातील पाणीही शुद्ध आहे. मात्र त्याची डागडुजी करणे गरजेचे आहे. रणजित टॉवर परिसरात दोन कूपनलिका बोरिंगमध्ये बदलण्यात आल्या आहेत. मात्र, त्यासुद्धा बंद पडल्या आहेत. पाटण कॉलनीत पूर्वी कूपनलिका होती. मात्र, वाहनधारकांकडून वाहन धुण्यासाठी येथील पाण्याचा वापर केला जाऊ लागल्याने पालिकेने ती कूपनलिकाच काढून टाकली. शहरात अशाप्रकारे अनेक ठिकाणी बंद पडलेल्या अवस्थेत असलेल्या कूपनलिकांची दुरुस्ती केल्यास नागरिकांना यातून स्वच्छ व चांगले पाणी मिळू शकते.सध्या सर्वत्र पाण्याची बचत करण्यासाठी जनजागृती केली जात आहे. तसेच दुसरीकडे ग्रामीण भागातील विहिरी, कूपनलिका यांतील पाणी आटल्याने त्या ठिकाणी कूपनलिका काढण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे. त्याचप्रमाणे गरजेनुसार पाणी वापरण्याच्या सूचना पालिका प्रशासनाकडून नागरिकांना देण्यात आलेल्या आहेत. घरगुती नळांना पाणी न आल्यास महिलांना अशा कूपनलिकांचाच मोठा आधार मिळत आहे. (प्रतिनिधी) योजना बंद; पण कूपनलिका चालू कऱ्हाडकरांसाठी पालिकेने चोवीस तास पाणी योजना उभारण्याचे काम सुरू केले. योजनेचे दोन ते तीन वर्षांपासून काम सुरू होते. ते आता बंद पडले आहे. मात्र दहा ते पंधरा वर्षांपूर्वी बसविण्यात आलेल्या काही कूपनलिका अजूनही चालू आहेत. पालिकेने या कूपनलिकांची दुरुस्ती व देखभाल करणे गरजेचे आहे. कूपनलिकांतून नागरिकांना पाणी मिळत असून, त्याची जपणूक करणेही तितकेच गरजेचे आहे.चोवीस तास पाणी उपलब्धशहरातील नागरिकांना चोवीस तास पाणी मिळावे म्हणून पालिकेकडून चोवीस तास पाणीपुरवठा योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून या योजनेचे काम संथगतीने सुरू आहे. मध्यंतरी योजनेचे काम बंदही पडले होते. मात्र, कामासाठी वाढीव मुदत मिळाल्याने योजनेचे काम सुरू करण्यात आले आहे. परंतु अद्यापही योजना पूर्ण झालेली नाही. याऊलट कूपनलिकांमध्ये अजूनही पाणी जास्त प्रमाणात असल्याने यातून चोवीस तास पाणीउपसा केला जातो.