शहरं
Join us  
Trending Stories
1
१८ वर्षाखाली सहमतीने शारीरिक संबंध ठेवू शकतो का?; केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दिलं उत्तर
2
उपराष्ट्रपतीपद भाजपकडेच ठेवण्याचा प्रयत्न; एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा
3
आजचे राशीभविष्य २५ जुलै २०२५ : या राशीला नशिबाची साथ लाभेल, धन प्राप्तीचे योग
4
ना नोकरी, ना सॅलरी तरीही मिळालं ५.५० कोटींचं कर्ज; SBI मध्ये मोठा घोटाळा उघड, १८ जण अटकेत
5
भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; ९९ टक्के भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही
6
गाझामध्ये पूर्ण युद्धबंदी लागू करा, भारताचे आवाहन; संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडले मत   
7
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ठरले भारी, कोलंबिया विद्यापीठ नमले! आता सरकारला २२० दशलक्ष डॉलर देणार
8
संसदेत गोंधळामुळे चौथ्या दिवशीही कोंडी; दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा तहकूब
9
रशियात विमान कोसळून ४८ जणांचा मृत्यू; अपघाताचे कारण अद्यापही गुलदस्त्यात
10
ताईसाहेबांचे सासर, माहेर कोणते? मतदारांना मतपत्रिकेवर समजणार!
11
सहा फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच; हायकोर्टाने घातले बंधन; सरकारला निर्देश
12
कोकाटेंची खुर्ची अजून शाबूत कशी? कृषीमंत्र्यांच्या 'बडबोलेपणा'वर अजितदादांचे मौन का?
13
अनिल अंबानींशी संबंधित ३५ ठिकाणी ईडीचे धाडसत्र; निवासस्थानी मात्र कारवाई नाही
14
स्विगी-झोमॅटो : ‘गिग’ कामगारांना हवी कायद्याची सुरक्षा
15
मातृभाषेचा अभिमान बाळगताना अन्य भाषांचाही सन्मान करावा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
संपादकीय : बीसीसीआयला 'सरकारी' वेसण! ऑलिम्पिकच्या दिशेने मोठे पाऊल
17
७/११ : आरोपींच्या निर्दोष मुक्ततेला ‘सुप्रीम’ स्थगिती; आरोपी बाहेरच राहणार! पण.. 
18
सवतीचे घर बळकावण्यासाठी क्रेनचा वापर; साथीदारांसह घरात घुसून केली मारहाण
19
उपराष्ट्रपती निवडणुकीत कुणाचं पारडं जड? एनडीए की इंडिया, कोण मारणार बाजी, असं आहे संसदेतील मतांचं गणित  
20
"सोनिया गांधी आमच्या देवी आहेत, त्यांनी…”, तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी उधळली स्तुतीसुमने   

तिसऱ्या दिवशी प्रणवचा मृतदेह पाण्यावर आला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पाचगणी : महू धरणात आजोबांबरोबर गुरे चारण्यासाठी गेलेला प्रणव संतोष गोळे (वय ११) या चिमुकल्याचा मृतदेह ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पाचगणी : महू धरणात आजोबांबरोबर गुरे चारण्यासाठी गेलेला प्रणव संतोष गोळे (वय ११) या चिमुकल्याचा मृतदेह बुधवारी तिसऱ्या दिवशी सकाळी पाण्यावर तरंगताना आढळून आल्याची माहिती करहर औट पोस्टचे ठाणे अंमलदार डी. जी शिंदे यांनी दिली.

महू ता. जावळी येथील धरण परिसरात प्रणव आजोबांच्या सोबत गुरे चारण्यास गेला होता. त्यावेळी नजर चुकवीत पोहण्यासाठी पाण्यात उतरला आणि पाण्यात बुडाला होता. गेले दोन दिवसांपासून ग्रामस्थ व महाबळेश्वर ट्रेकर्सचे जवान प्रणवचा शोध घेत होते. पोलीस धरणावर ठिय्या मांडून होते. परंतु प्रणवचा कोठेच ठावठिकाणा लागत नव्हता. आज सकाळी साडेसहाच्या सुमारास प्रणवचा मृतदेह पाण्यावर तरंगत असताना दिसला.

प्रणवचा मृतदेह सापडल्याचे समजताच संपूर्ण महू गाव धरणाकडे लोटला. यावेळी त्याच्या आई-वडिलांचा व कुटुंबीयांचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश पाहून उपस्थितांची मने हेलावून गेली. आजोबांनी प्रणवला दिलेली हाक शेवटचीच ठरली. येथे जमलेल्या सर्वांच्याच डोळ्यात अश्रू तरळले होते. सदर घटनेची नोंद मेढा पोलीस ठाण्यात झाली आहे.

गेले दोन दिवसापासून मेढा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल माने, कुडाळचे पीएसआय महेश कदम, करहरचे डी. जी. शिंदे परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून होते. शिंदे आणि पोलीस पाटील अक्षरशः ठिय्या मांडून होते. उपविभागीय अधिकारी सोपान टोम्पे, तहसीलदार राजेंद्र पोळ, गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनीही घटनास्थळी भेट दिली होती. महाबळेश्वर ट्रेकर्सचे जवान सुनील बाबा भाटिया, अनिल केळगणे, अनिल लांगी, अमित झाडे, सौरभ साळेकर, आकेश धनावडे, दीपक झाडे, अमित कोळी, अक्षय नाविलकर प्रणवच्या शोधासाठी प्रयत्न करीत आहेत. ग्रामस्थही त्यांना सहकार्य करीत होते. अखेर आज सकाळी प्रणवचा मृतदेह पाण्यावर तरंगत असताना सापडला आणि महू गावावर शोककळा पसरली.