शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्यांनी सोनं चोरलं.. लेकरांनी मन जिंकलं..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 22:52 IST

सातारा : उदयनराजे भोसले यांच्या रॅलीत शिरकाव करून चोरट्यांनी अक्षरश: धुुमाकूळ घातला. एकीकडे हे चोरटे लोकांचे लक्ष नसताना सोनं ...

सातारा : उदयनराजे भोसले यांच्या रॅलीत शिरकाव करून चोरट्यांनी अक्षरश: धुुमाकूळ घातला. एकीकडे हे चोरटे लोकांचे लक्ष नसताना सोनं चोरत होते, तर दुसरीकडे कष्ट करणारी चिमुरडी कार्यकर्त्यांची मनं चोरत होती.साताऱ्यात मंगळवारी काढण्यात आलेल्या रॅलीत चोरट्यांनी सुमारे ३३ तोळे सोने चोरलं. चोरट्यांचा हा प्रकार गुपचूप सुरू असतानाच पोवई नाक्यावर कार्यकर्त्यांच्या पायात पडलेल्या बाटल्या उचलण्याचं काम अवघ्या आठ ते बारा वर्षांची मुले करत होती. रॅलीत पाणी पिऊन झाले की या बाटल्या रस्त्यावर टाकण्यात आल्या. सभा सुरू झाल्यानंतर काही वेळातच तीन मुलं याठिकाणी आली. हातात मोठं प्लास्टिकचं पोतं घेऊन त्यांनी कार्यकर्त्यांच्या पायातील रिकाम्या प्लास्टिकच्या बाटल्या उचलल्या. परस्परांना खुणवून त्यांनी आपापलं कार्यक्षेत्रही निश्चित केलं होतं.राजवाडा, सिटी पोस्ट आणि पोवईनाका येथे आपल्या आईसह ही तीन मुलं फिरत होती. रॅली नाक्यावर पोहोचल्याचा अंदाज घेऊन एकेक मूल पोवई नाक्यावर पोहोचले.याविषयी ‘लोकमत’शी बोलताना त्यांच्यातील सुदेश म्हणाला, ‘उन्हाळ्याच्या दिवसात पाणी वाटतात, हे आम्हाला माहीत आहे. म्हणून आम्ही पाच पोती घेऊन घरातून बाहेर पडलो; पण बाटल्या जास्त मिळाल्या. म्हणून ठेकेदाराकडे तीन पोती रिकामी करून पुन्हा नाक्यावर आलो. ठेकेदार बाटल्या न मोजता एका पोत्याचा हिशोब लावणार. गेल्या तीन तासांत आम्ही ९ पोती भरून रिकाम्या बाटल्या गोळा केल्यात. त्यातून हजार-बाराशे रुपये सहज मिळतील.’ शाळेत जातो का? या प्रश्नावर चटकन उत्तर आलं, ‘आज सकाळीच पेपर होता. परीक्षा दिली, आहार खाल्ला अन् कामाला आलो. एकट्या आईला हे गोळा करणं अवघड झालं असतं ना?’गर्दीतील अनेकांनी आपल्या पायाजवळील रिकाम्या बाटल्या त्यांच्या पोत्यात टाकून त्यांनाही या कामात मदत केली.मिरजेच्या कार्यकर्त्याची सतर्कताया रॅलीत सांगली-मिरज या भागातूनही कार्यकर्ते जमा झाले होते. मिरज येथे सोने-चांदीचे व्यापारी असलेले विक्रम देसाई यांच्या गळ्यातील चेन चोरण्याचा प्रयत्नही शेटे चौक परिसरात झाला; पण गळ्यामागे कोणाचातरी हात आल्याने ते सतर्क झाले. त्यांनी गळ्यातील चेनला हात लावेपर्यंत चेन पेंडंटसह हातात आली. पण गर्दीचा फायदा घेऊन त्यांच्या खिशातील काही रक्कम मात्र चोरट्यांनी पळविली.एक पोतं बाटल्या अन् दीडशेची जुळणीरॅलीच्या ठिकाणी सुमारे दहा हजार बाटल्यांचे वाटप करण्यात आले. यातील अनेकांनी पाणी पिऊन बाटली तिथेच टाकली. या बाटल्या पोत्यात भरून भंगार व्यावसायिक यांच्याकडे विक्रीसाठी नेल्या जातात. एका पोत्याला साधारण दीडशे रुपयांचा भाव मिळण्याचा अंदाज आहे. रणरणत्या उन्हात चार तास काम केल्यानंतर या चारजणांना दीड हजार रुपये मिळतील, अशी खात्री त्यांना होती.