शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

चोर शिरजोर; तरीही ‘खाकी’लाच पडला घोर!

By admin | Updated: December 29, 2016 00:21 IST

कऱ्हाड अस्वस्थ : पोलिसांनाच बेड्या; मारामारीच्या घटनांत वाढ

संजय पाटील ल्ल कऱ्हाड सरते वर्ष कऱ्हाडच्या पोलिसांना तसेच शहरवासीयांनाही अस्वस्थ करणारे ठरले. वर्षाच्या मध्यंतरात संशयिताच्या खूनप्रकरणी पोलिसांवरच गुन्हा दाखल झाला. संबंधित पोलिस निलंबित झाले. तसेच नुकतीच त्यांना अटकही झाली. दरम्यानच्या कालावधीत शहरामध्ये खून, मारामारी, चोरीसारख्या अन्य गंभीर घटना घडल्या. त्यामुळे शहरातील वातावरणही अस्वस्थ झाल्याचे पाहायला मिळाले. कऱ्हाड शहर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकपदी विकास धस यांची नेमणूक झाल्यानंतर शहरातील कायदा, सुव्यवस्था आणखी बळकट होण्याची अपेक्षा होती. मात्र, अशातच संशयित रावसाहेब जाधवचा पोलिसांच्या ताब्यात असताना मृत्यू झाला. त्यामुळे जून महिना पोलिस दलात खळबळ माजविणारा ठरला. संशयिताच्या मृत्यूनंतर शहरातील वातावरण चिघळले. जमावाने मोर्चा काढला. अखेर निरीक्षक धस यांच्यासह बारा पोलिसांना निलंबित करून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना घडून गेल्यानंतर काही दिवसांतच पुन्हा एकदा पोलिसांवर विनाकारण मारहाणीचा आरोप झाला. स्थानिक गुन्हे शाखेने शहरातील एका युवकाला शस्त्र बाळगल्याच्या संशयावरून ताब्यात घेतले होते. मात्र, पोलिसांनी ताब्यात घेऊन कोंडून ठेवून मारहाण केल्याचा आरोप संबंधित युवक व त्याच्या नातेवाइकांनी केला. त्यामुळे पुन्हा एकदा पोलिस दलात खळबळ उडाली. या प्रकरणात तक्रार झाली. मात्र, पुढे वातावरण निवळले. दरम्यानच्या कालावधीत शहरामध्ये चोरी व मारामारीच्या घटना घडल्या. चोरट्यांनी बंद फ्लॅटला लक्ष केले. लाखो रुपयांचा ऐवज चोरीस गेला. धूमस्टाईल चोरट्यांनी बँकेची अठरा लाखांची रोकड लंपास केली. तसेच ट्रॅव्हल्समधून ७७ लाखांचे अडीच किलो सोन्याचे दागिनेही चोरीस गेले. अनेक दुचाकींवर चोरट्यांनी डल्ला मारला. या घटना होत असतानाच मारामारीच्या गंभीर स्वरूपाच्या घटनाही घडल्या. शहरातील एका मोबाईल शॉपीत काही युवकांनी तोडफोड केली. ही तोडफोड तत्कालिक कारणावरून झाल्याचे समोर येत असले तरी शहरात पुन्हा एकदा टोळीयुद्धाचा भडका उडण्याची शक्यता त्या घटनेने समोर आली. शहरात खुनाच्या वर्षभरात चार घटना घडल्या. पोलिसांचा गौरवहीदत्त चौकातील पाटील हेरीटेज इमारतीत चोरीची घटना घडली होती. त्यावेळी पोलिसांनी धोका पत्करून संबंधित चोरट्यांना रंगेहाथ पकडले. यावेळी चोरट्यांनी हल्ला केल्याने दोन पोलिस कर्मचारीही गंभीर जखमी झाले होते. शहर पोलिस ठाण्यातील गुन्हे शाखेच्या या कामगिरीचा त्यावेळी पोलिस दलासह शहरवासीयांनीही गौरव केला.