शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

‘कमवा व शिका’च्या मुलांनाच त्यांनी मानली आपली भावंडं !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 23:03 IST

भोलेनाथ केवटे।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : रक्षाबंधन हा सण बहीण-भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि भाऊ तिचं रक्षण करण्याचं वचन देतो. साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या कमवा व शिका योजनेतील विद्यार्थ्यांना देशमुख कुटुंबीय राखी बांधून अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे करीत आहे. गेल्या ...

भोलेनाथ केवटे।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : रक्षाबंधन हा सण बहीण-भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि भाऊ तिचं रक्षण करण्याचं वचन देतो. साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या कमवा व शिका योजनेतील विद्यार्थ्यांना देशमुख कुटुंबीय राखी बांधून अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे करीत आहे. गेल्या ३४ वर्षांपासून या कुटुंबाने विद्यार्थ्यांशी ऋणानुबंध जपले आहेत.साताºयातील अरविंद देशमुख हे अनाथ. लहानपणीच त्यांच्यावरील आई-वडिलांचं छत्र हरपलं. ते एकटेच असल्याने त्यांना आई-वडिलांची तसेच बहिणीची उणीव भासत होती. त्यांचं सर्व शिक्षण हे वसतिगृहातच झाले. १९७७ मध्ये कमवा व शिका योजेनतून त्यांनी शिक्षण घेतलं, कमवा व शिका योजनेतील विद्यार्थी महाविद्यालयाच्या शेतात तसेच इतर विभागांत काम करून शिक्षण घेत असतात. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांच्या सुख-दु:खाची त्यांना जाणीव होती. यातूनच अरविंद देशमुख यांनी पत्नी अरुणा यांच्यापुढे कमवा व शिका योजनेच्या मुलांना राखी बांधण्याची कल्पना सुचविली आणि दोघांनीही १९८५ पासून हा उपक्रम सुरू केला.या योजनेतील मुलं गरीब आहेत. कामामुळे आणि शिक्षणामुळे या मुलांना त्यांच्या स्वत:च्या घरी रक्षाबंधनासाठी जाता येत नाही. त्यात काही मुलांचे गावही खूप लांब आहेत. त्यामुळे या मुलांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, या भावनेतून देशमुख कुटुंबीय दरवर्षी या मुलांना न चुकता राख्या बांधतात व त्यांना बहिणीची उणीव कधीच भासू देत नाहीत. देशमुख कुटुंबीयांचा हा उपक्रम गेल्या ३४ वर्षांपासून अविरत सुरू आहे. या सोहळ्यात प्राचार्य डॉ. भाऊसाहेब कराळे, प्रा. रामराजे माने-देशमुख, प्रा. राहुल व्हराडे यांच्यासह विद्यार्थीही सहभागी झाले होते.शस्त्रक्रिया असतानाही घेतला कार्यक्रम..दोन वर्षांपूर्वी रक्षाबंधनादिवशीच देशमुख यांच्यावर अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया झाली होती. तरीसुद्धा त्यांनी त्यांच्या पत्नीला वसतिगृहातील मुलांना राख्या बांधण्यासाठी पाठविले होते. मुलांविषयी असणारे त्यांचे हे प्रेम त्यावेळीही प्रकर्षानं जाणवलं.पूर्ण कुटुंबाचा सहभागया उपक्रमात अरविंद देशमुख यांच्या पत्नीबरोबर त्यांच्या अमृता व अनुजा या दोन मुली, सून अंजली तसेच मुलगा अमरदीप यांचादेखील सहभाग असतो. हे कुटुंब मुलांसाठी अल्पोपहारसुद्धा देतात.मी स्वत: कमवा व शिका योजनेचा विद्यार्थी असल्याने मला या मुलांबद्दल विशेष प्रेम आहे. बॅरिस्टर पी. जी. पाटील यांच्या पे्ररणेतून मी व माझ्या पत्नीने या मुलांना राखी बाधंण्याचे ठरविले. मुलांच्या मनगटावर राखी बांधताना त्यांच्या चेहºयावरील आनंद पाहून मला मनोमन समाधान वाटतं.- अरविंद देशमुख, निवृत्त अधीक्षक