शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

गुरं खात नाहीत, ते खातात माणसं!

By admin | Updated: December 26, 2014 23:54 IST

रेशनिंगचा गहू : दगड, माती, काड्यांचा गोरगरिबांना ‘पौष्टिक’ आहार

सागर गुजर - सातारा -हाडाचा शेतकरी घासातला घास गुरांना देतो. चुकून अयोग्य वस्तू गुरांच्या खाण्यात येऊ नये, याचीही काळजी घेतो; पण आपलं शासन जिवंत माणसांच्या आरोग्याबाबतही उदासीन आहे. गुरेही खात नाहीत असे खडे, मातीमिश्रित गहू रेशनिंगच्या माध्यमातून घराघरांत पोहोचत आहेत. ‘पापी पेट का सवाल है भैय्या,’ म्हणत पोटाची खळगी भरण्यासाठी सामान्य कुटुंबे नाइलाजानं खडे बाजूला करुन गहू दळणाला पाठवत आहे. याच ‘पौष्टिक’ अन्नावर पोसलेले देह काबाडकष्ट करतात, म्हणून त्यांची अशी हेळसांड केली जातेय का, असा सवाल सर्वसामान्यांतून विचारला जात आहे.दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना (शासनाच्या भाषेत प्राधान्य कुटुंबे) दोन रुपये ८0 पैसे प्रतिकिलो दराने महिन्याकाठी ३५ किलो गहू मिळतो. बाजारभावाच्या तुलनेत अत्यंत कमी दरात मिळत असल्याने गोरगरीब लोक तोच खरेदी करतात. हा गहू किडका नसला तरी त्यात माती, काड्या, खडेमिश्रित माती, लाकडी काड्या यांचा भरणा आहे. सदर बझार येथील प्राधान्य कुटुंबे सध्या हा गहू स्वच्छ करण्यात गुंतलेली पाहायला मिळतात. हा प्रश्न एकाच ठिकाणचा नसून जिल्ह्यातील नागरिकांना रेशनिंगमधून मिळणाऱ्या धान्याचा हा सार्वत्रिक अनुभव आहे. दरम्यान, याबाबत पुरवठा विभागाशी संपर्क साधला असता, ‘वखार महामंडळातील धान्याची तपासणी करुन मगच ते स्वस्त धान्य दुकानदारांकडे पाठविले जाते. त्यातूनही दुकानदारांनी काही आक्षेप घेतल्यास तो गहू शासनाकडे परत केला जातो,’ असं सांगण्यात येतंय. त्यामुळे नेमकं ‘पाणी कुठे मुरतंय’ हे समजेनासं झालंय. दुकानदाराकडे जर अस्वच्छ गहू आला तर तोच कार्डधारकांच्या माथी मारला जातोय, हे स्पष्ट होत आहे. अथवा काही जण त्यात दगड, माती टाकून ‘वजन’ वाढवतात, असंही म्हणायला वाव आहे. पुरवठा विभागाने यात लक्ष घालावे, तसेच छापासत्र राबवून गव्हात खडे मिसळून गरिबांच्या आरोग्यावर उठणाऱ्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी सामान्य नागरिकांतून होत आहे. जिल्ह्यातील रेशनिंगचा लेखाजोखारेशनिंग परवानाधारक : केरोसीन परवानाधारक : शिधापत्रिकाधारक : प्राधान्य कुटुंबे : रेशनिंगवर धान्य पाठविण्याआधी त्याची तपासणी केली जाते. रेशनिंग दुकानातील निकृष्ट धान्याविषयी तक्रार असल्यास नागरिकांनी पुरवठा विभागाशी संपर्क साधावा. संबंधित दुकानदारांवर कारवाई केली जाईल.- शमा ढोक (पवार)जिल्हा पुरवठा अधिकारीमहिन्याकाठी होणारा धान्यपुरवठागहू 5हजार 660 मेट्रिक टनतांदूळ3हजार 900 मेट्रिक टन