शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पवारवाडीत तुफान आलंया...काळ्या भुईचं सपानं आलंया!

By admin | Updated: May 22, 2017 17:03 IST

शेकडो कार्यकर्त्यांचा सहभाग : सावित्रीच्या लेकींकडून पवारवाडीत श्रमदान

आॅनलाईन लोकमतसातारा, दि. २२ : सातारा जिल्ह्यातील पवार वाडीत शनिवार दि. २0 आणि रविवार दिनांक २१ मे रोजी राष्ट्र सेवा दलातल्या "सावित्रीच्या लेकी "समवेत राज्यभरातून आलेल्या शेकडो राष्ट्र सेवा दल सैनिकांनी श्रमदान केले. श्रमदान करणाऱ्या मध्ये तरुणींची संख्या लक्षणीय होती.मुंबई, पालघर, पनवेल, सिंधुदुर्ग, नासिक, मालेगाव, पुणे, सातारा, सांगली, मिरज, कोल्हापूर, इचलकरंजी, सोलापूर अशा राज्यभरातील सेवादल शाखांमधून कार्यकर्ते श्रमदानासाठी पवार वाडीत दाखल झाले होते. झाडे लावण्यासाठी शेकडो खड्डे त्यांनी खोदले. येत्या पावसाळ्यात तिथं झाडे लावली जाणार आहेत. इचलकरंजीच्या कार्यकर्त्यांनी सीड बँकेच्या माध्यमातून शाळा-शाळा मधून जमा केलेल्या हजारो बिया गावच्या सरपंचांकडे दिल्या.

राष्ट्र सेवा दलाच्या कार्यकर्त्यांशी गावकरी मोकळा संवाद करताना दिसत होते.या पुढे स्मार्ट व्हिलेज करण्याचा संकल्प या गावचे तरुण सरपंच राजेंद्र पवार यांनी बोलून दाखविला.जल संधारणाबरोबर या गावातील लोकांचे मनसंधारण या निमित्ताने झाले ही या "सत्यमेव जयते वॉटर कप" स्पर्धेची आणि "राष्ट्र सेवा दला" सारख्या संघटनेचे यश आहे. या शिबिरात श्रमदानाबरोबरच लेक लाडकी अभियानाच्या वर्षा देशपांडे, शाहीर कैलास जाधव, राष्ट्र सेवा दलाचे कार्यकारी विश्वस्त डॉ अभिजीत वैद्य, तरुण कीर्तनकार सचिन पवार, पवार वाडीचे सरपंच राजेंद्र पवार, वसंतदादा पाटील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सचिन माने, पत्रकार अश्विनी सातव, राजा भाऊ अवसक, प्रा. रामदास निकम यांनी दोन दिवस मार्गदर्शन केले. देशा मध्ये धर्माच्या,जातीच्या नावावर जे राजकारण सुरु आहे त्याच्या विरोधात श्रम दाना बरोबरच वैचारिक श्रमदान करण्याची गरज राष्ट्र सेवा दलाचे कार्यकारी विश्वस्त डॉ अभिजीत वैद्य यांनी व्यक्त केली. राष्ट्र सेवा दलाचे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष अल्लाउद्दीन शेख, मुंबईचे कार्याध्यक्ष शरद कदम, संजय रेंदाळकर, सचिव नचिकेत कोळपकर , विद्याधर ठाकूर, कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष हेमंत डिग्रजे, छात्र भारतीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष दत्ता ढगे, सुनील स्वामी, दामिनी पवार, उषा कोष्टी, वैशाली हुबळे, शोभा स्वामी, श्वेता दिब्रिटो आदी कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते. पाणी फौंडेशनच्या या स्पर्धेच्या माध्यमातून बांधावरून गावात सुरु असलेले वाद १00 टक्के मिटले आहेत. जलसंधारणाबरोबर मनसंधारणेचे काम या निमित्ताने झाले.माणसे जोडण्याचे सेवा दलाचे हे काम आम्ही पुढे नेऊ.- राजेंद्र पवार, सरपंच,पवारवाडी, ता.कोरेगाव