शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 खासदारांना चिठ्ठी लिहून देणारा कोणी मिळाला नसावा: नरेंद्र पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 23:54 IST

सातारा : ‘साताऱ्याच्या खासदारांना २३ प्रश्न विचारले होते, एकाचेही उत्तर अद्यापही मिळालेले नाही. १० वर्षे खासदार राहिलेल्यांना चिठ्ठी लिहून ...

सातारा : ‘साताऱ्याच्या खासदारांना २३ प्रश्न विचारले होते, एकाचेही उत्तर अद्यापही मिळालेले नाही. १० वर्षे खासदार राहिलेल्यांना चिठ्ठी लिहून देणारा कोणी मिळाला नसावा, असे वाटते. यावरून ते किती कार्यक्षम आहेत, हेही दिसत असून, लोकांशी निगडित प्रश्नांची उत्तरे त्यांनी द्यावीत,’ असा घणाघाती हल्ला शिवसेनेचे उमेदवर नरेंद्र पाटील यांनी उदयनराजेंवर नाव न घेता पुन्हा एकदा केला.सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, शहराध्यक्ष विकास गोसावी, नगरसेवक विजय काटवटे, धनंजय जांभळे आदी उपस्थित होते.शिवसेनेचे उमेदवार पाटील म्हणाले, ‘छत्रपती म्हणून साताºयाच्या खासदारांना विरोध नाही; पण ते योग्य लोकप्रतिनिधी नाहीत. तर खासदारांच्या जवळचीच माणसे उमेदवाराला पळवून नेतात. हे काय योग्य नाही. आज खासदारांकडूनच अपमानित झालेले लोकही त्यांच्याच जवळ आहेत. त्या लोकांनाही हे कसे पटते समजत नाही. सातारा नगरपरिषदेत तर सर्व गोंधळाचाच कारभार सुरू आहे. खासदारांनी निवडणुकीसाठी कार्यालय घेतलंय. त्याचा कर भरला नसल्याचं समोर आलं आहे. मुख्याधिकाऱ्यांनी याचा खुलासा करावा. पालिकेतील अंधाधुंद कारभाराचा मुख्यमंत्र्यांच्या सभेत चांगलाच समाचार घेतला जाणार आहे.’ खासदारांच्या माणसांच्या माध्यमातून पोलिसांवरही दबाव आणला जात आहे, असा आरोप करून पाटील पुढे म्हणाले, ‘राज ठाकरेंनी साताºयात सभा घेतली. त्यावेळी त्यांच्या भाषणात मोदी द्वेषच होता. येथील उमेदवाराबद्दल ते काहीच बोलले नाहीत. ठाकरे हे चांगले व्यंगचित्रकार आहेत. त्यांनी इथल्या उमेदवाराबद्दल बोलले असते तर चांगले झाले असते.’माजी मंत्री विलासकाका पाटील-उंडाळकर यांचाही आशीर्वाद घेतला आणि त्यांनीही मला दिला. या निवडणुकीत कोण-कोण पाठीशी आहे, हे सांगणे आता बरोबर नाही, असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.मिशीपेक्षा दाढी चांगली...पत्रकार परिषदेत आमचं ठरलंय अन् मिशी व कॉलरबद्दल नरेंद्र पाटील यांना बोलतं केलं. त्यावेळी पाटील यांनी कॉलर का मिशी चांगली तुम्हीच ठरवा. मर्दाची शान ही मिशी असते. दाढी ठेवणं हे तर अधिकच चांगलं असतं, असंही सांगितले. यावर उपस्थित राजकीय पदाधिकाºयांबरोबरच कार्यकर्त्यांमध्ये आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याच नावाने चर्चा सुरू झाली अन् हा एक डिवचण्याचाच प्रकार होता, असंही समोर आलं.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक