शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पाणी अडविण्याची हिंंमत रामराजेंमध्ये नाही

By admin | Updated: May 17, 2017 23:13 IST

पाणी अडविण्याची हिंंमत रामराजेंमध्ये नाही

लोकमत न्यूज नेटवर्कखंडाळा : ‘नीरा-देवघर धरणाचे पाणी यापूर्वीच वीर धरणात सोडले गेले आहे. वीर धरणाच्या कालव्याद्वारे ते केवळ बारामतीला पळवले जात आहे. आठ दिवसांपूर्वी नीरा-देवघरचे पाणी वाघोशीपर्यंत आणल्याचा डांगोरा पिटला गेला. मात्र, हे पाणी शेतकऱ्यांसाठी नव्हे तर न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सोडले गेले होते. वास्तविक, नीरा-देवघरच्या पाण्याची आग्रही मागणी आमदार मकरंद पाटील व विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर करू शकत नाहीत. कारण, हे पाणी ज्यांना चाललंय त्यांना अडविण्याची हिंमत यांच्यात नाही,’ असा घणाघात जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अ‍ॅड . बाळासाहेब बागवान यांनी केला.खंडाळा येथील पत्रकार परिषदेत ते म्हणाले, ‘रामराजेंनी पाण्याबाबत खंडाळकरांचा विश्वासघात केला आहे. नीरा-देवघरचे पाणी तातडीने खंडाळा तालुक्यातील शेतीसाठी सोडावे अन्यथा शेतकऱ्यांच्या वतीने तीव्र आंदोलन उभारणार आहे.’ ते पुढे म्हणाले, ‘नीरा-देवघरचे पाणी मार्च २०१६ पर्यंत कामे पूर्ण करून पोहोचवावे, असा न्यायालयाचा आदेश राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाला होता. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत पाणी देणे बंधनकारक असल्याने पाणी सोडण्यात आले.मात्र, त्यात पाणी पूजनासाठी श्रेयवाद उफाळला. आमदारांनी पाणी पूजन केले तेव्हा तर कालव्याचे पाणीही बंद झाले होते. वाजतगाजत पाणी आल्याचा डांगोरा पिटून शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळ फेकली जात आहे.’ यामुळे खरच शेतीला पाणी मिळाले का? याचा विचार करणे गरजेचे आहे. पाणी आणलं म्हणता मग चालू का ठेवले नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला तर आमदार हे श्रेय घेण्यासाठीच पाणी पूजनाला आले होते, अशी टीका शामराव धायगुडे यांनी केली.सध्या खंडाळा तालुक्यात शेतीला पाणी नाही. जनावरांना आणि पिण्याच्या पाण्याचीही टंचाई अनेक गावांतून आहे. असे असताना न्यायालयात पाण्यासाठी आमचे प्रयत्न पूर्ण ताकदीने सुरू आहेत हे दाखविण्यासाठी केलेलं नाटक आहे. त्यामुळे जनतेने सावध राहावे. नीरा-देवघर प्रकल्पात विस्थापित होणाऱ्या कुटुंबांना आणण्यासाठी रामराजेच मुराळी होते. मात्र, त्यांना मूलभूत सुविधा पुरविताना त्यावेळी जलसंपदा मंत्री असतानाही वाऱ्यावर सोडले. पुनर्वसित लोकांच्या जमिनींना पाणी देण्याची जबाबदारी सरकारची नाही, असेही यांनीच स्पष्ट केल्याचे सांगितले. नीरा-देवघरचे एक टीएमसी पाणी उपसा करून धोम-बलकवडी कालव्याद्वारे फलटण माळशिरसला नेण्याचा घाट सरकार दरबारी घातला जात आहे. त्यामुळे खंडाळा तालुक्यातील जनतेची फसवणूक केली जात असल्याचे सांगून नीरा-देवघरचे पाणी सोडावे, अशी मागणीही त्यांनी केली. पाणी न मिळाल्यास मोर्चा काढून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असे स्पष्ट केले. पत्रकार परिषदेस माजी सभापती एस. वाय. पवार, शामराव धायगुडे, अशोक डोईफोडे उपस्थित होते.