शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

रेमडेसिविरसह लसीकरणासाठी केंद्राकडून अपेक्षित सहकार्य नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:38 IST

मलकापूर : ‘राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. कोरोनाच्या रुग्णांना निकषाप्रमाणे व डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपचार झाले पाहिजेत. त्यामध्ये नातेवाईकांचा हस्तक्षेप ...

मलकापूर : ‘राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. कोरोनाच्या रुग्णांना निकषाप्रमाणे व डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपचार झाले पाहिजेत. त्यामध्ये नातेवाईकांचा हस्तक्षेप नको. सध्या सर्वत्र लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत असल्यामुळे काही प्रमाणात लसीचा तुटवडा भासत आहे. तर वाढत्या रुग्णसंख्येच्या प्रमाणात रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध होत नाही. ही परिस्थिती केंद्र सरकारकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याचा परिणाम आहे,’ असा आरोप पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केंद्र सरकारवर केला आहे.

‘ब्रेक द चेन’ हा शासनाने पंधरा दिवसाचा अंशतः लॉकडाऊन केला आहे. त्यासाठी केलेल्या उपाययोजनांची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री पाटील हे मलकापुरात आले असता बोलत होते. यावेळी पोलीस उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे यांच्यासह पालिका पदाधिकारी व आजी-माजी नगराध्यक्ष व नगरसेवक उपस्थित होते. मंत्री पाटील म्हणाले, ‘ऑक्सिजनमुळे वाईट प्रसंग उद्भवणार नाही, यासाठी शासन प्रयत्नशील आहे. यावर मात करण्यासाठी उद्योगांचा ऑक्सिजन पुरवठा बंद करून केवळ रुग्णांसाठी ऑक्सिजनचा वापर सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. जनजागृती व शहरात येणाऱ्यांसाठी कडक उपाययोजना करणे गरजेचे आहे. लवकरच गरजेनुसार लस वा रेमडेसिविर उपलब्ध करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. ही जागतिक पातळीवरील नैसर्गिक आपत्ती आहे. या आपत्तीला सर्वांनी एकत्र येऊन सामोरे गेले पाहिजे व त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.’

चौकट

मलकापुरातील ६ ठिकाणच्या नाकाबंदीची पाहणी

१) मलकापूर फाटा

२) मलकापूर नवीन भाजी मंडई

३) भारती विद्यापीठ लसीकरण केंद्र

४) मलकापूर जुनी मंडई

५) शिवछावा चौक नाकाबंदी

६) आगाशिवनगर परिसर

(चौकट)

शंभरवर दुचाकी जप्त

मलकापूर फाटा नाकाबंदीला अचानक भेट देऊन कऱ्हाड शहर पोलिसांनी योग्य कारणाशिवाय फिरणाऱ्या चालकांकडून शंभर दुचाकी ताब्यात घेतल्या. त्या वाहनांचीही पाहणी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केली.

फोटो कॅप्शन

२४ मलकापूर

शिवछावा चौकात अधिकाऱ्यांकडून माहिती घेत शहरातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच महामारीचे हे संकट रोखण्यासाठी अधिकाऱ्यांना काही सूचनाही केल्या. ( छाया : माणिक डोंगरे)