शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

विकासाच्या कैफात पर्यावरणाचा बळी नको

By admin | Updated: August 29, 2014 23:12 IST

पश्चिम घाट परिसर तज्ज्ञगटाचा अहवाल फेटाळण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर पर्यावरण क्षेत्रातून संमिश्र

सातारा : पश्चिम घाट परिसर तज्ज्ञगटाचा अहवाल फेटाळण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर पर्यावरण क्षेत्रातून संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. विकास गरजेचा आहेच; मात्र त्यासाठी पर्यावरणाचे मोल देणे दीर्घकालीन विचार करता तोट्याचे आहे, अशी भावना व्यक्त होत आहे. ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली केंद्राने पश्चिम घाट परिसर तज्ज्ञगटाची नियुक्ती केली होती. पर्यावरण संवर्धन स्थानिक जनसमूहांच्या हाती देणे, परिसरातील विकासाचे निर्णय ग्रामसभांनी घेणे आणि पर्यावरणविषयक कायद्यांचे काटेकोर पालन केले जाणे, या डॉ. गाडगीळ यांच्या प्रमुख शिफारशी होत्या. मात्र, हा अहवाल विकासविरोधी असल्याची तक्रार करून त्यास झालेल्या विरोधाची धार पाहून केंद्राने अहवालाचा फेरआढावा घेण्यासाठी अंतरिक्ष शास्त्रज्ञ डॉ. कस्तुरीरंगन यांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय समिती नियुक्त केली होती. या समितीचा अहवाल स्वीकारून डॉ. गाडगीळ यांचा अहवाल फेटाळल्याची घोषणा केंद्राने गुरुवारी केली.पर्यावरण क्षेत्रातील तज्ज्ञ आणि कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता, ‘निसगर्संवर्धनाला कुणीच तयार नाही. विकासाच्या नावाखाली निसर्ग कुरतडला जात आहे. कधीतरी जाग येईल; पण तेव्हा वेळ निघून गेलेली असेल,’ अशा भावना व्यक्त करण्यात आल्या. मात्र, कस्तुरीरंगन यांचा अहवालही शास्त्रीय असून, त्यामुळे विकास आणि पर्यावरण संवर्धन दोन्ही कामांना होत असलेला विलंब टळेल, असेही मत व्यक्त करण्यात आले. कास पठारावर कुंपणाला झालेला विरोध त्यावेळी दुर्लक्षित झाला; मात्र आता कुंपण चुकीचे असल्याचे ‘युनेस्को’च्याच प्रतिनिधीने सांगितले आहे, याची आठवण या आंदोलनात सहभागी झालेल्यांनी करून दिली. ‘माधव गाडगीळ चूक आहेत, असे या क्षेत्रातील एकतरी माणूस दाखवा,’ असे आव्हान देतानाच ‘यापेक्षा कडक निर्बंध परदेशांत आहेत आणि ते काटेकोरपणे पाळले जातात,’ याकडेही अनेकांनी लक्ष वेधले. (प्रतिनिधी)डॉ. गाडगीळ यांच्या अहवालातील मूळ तत्त्वे डॉ. कस्तुरीरंगन यांनी कायम ठेवली आहेत. उलट डॉ. कस्तुरीरंगन यांचा अहवाल अधिक शास्त्रीय आणि काटेकोर आहे. संवेदनशीलता ठरविण्यासाठी गाडगीळ यांनी ९ किमीचा झोन मानला आहे, तर कस्तुरीरंगन यांनी २४ मीटरचा झोन करून दूरसंवेदन तंत्राने अधिक काटेकोर मूल्यमापन केले आहे. संवर्धनाची तातडीची गरज त्यांनीही अधोरेखित केली असून, स्थानिकांच्या विचाराने पुढे जाण्यास सुचविले आहे. विकासाचे पुढील निर्णय शास्त्रीय आधारावरच घेतले जावेत. - डॉ. राजेंद्र शेंडे, अध्यक्ष, तेरे पॉलिसी सेंटरप्रत्येक क्षेत्रात संशोधन झाले पाहिजे, संशोधनावर खर्च झाला पाहिजे, असे सगळेच राज्यकर्ते म्हणतात. मोदीही नुकतेच तसे म्हणाले होते. पर्यावरण विषयात डॉ. गाडगीळ यांच्यापेक्षा मोठा संशोधक कोण असेल? संशोधकांचे काही ऐकायचेच नसेल, तर संशोधनाची भाषा आणि त्यावर खर्च तरी कशाला करता?- डॉ. विश्वास देशपांडे, प्राणिशास्त्र विभाग, वाय. सी. कॉलेज, साताराडॉ. गाडगीळ यांच्या अहवालाविरुद्ध सामान्य लोक रस्त्यावर आले होते; मात्र त्यामागे अनेक ‘लॉबी’ होत्या. एकीकडे पश्चिम घाटाचा समावेश जागतिक वारसास्थळात व्हावा म्हणून सरकारनेच युनेस्कोकडे शिफारस करायची आणि दुसरीकडे त्याच्या संवर्धनाविषयीचा तज्ज्ञांचा अहवाल फेटाळायचा, हा दुटप्पीपणा झाला.- नाना खामकर, पर्यावरणवादी कार्यकर्तेडॉ. गाडगीळ यांचा अहवाल केंद्र सरकारने फेटाळला असला, तरी डॉ. कस्तुरीरंगन यांंचा अहवाल स्वीकारला आहे. नव्या सरकारची धोरणे विकासाला अधिक पोषक असल्याचे दिसून येते. तथापि, निसर्ग लयाला गेल्यास काय होईल, याचा विचार केला पाहिजे. येणाऱ्या पिढीला आपण काही शिल्लक ठेवणार की नाही, याचे भान ठेवायला हवे.- रोहन भाटे, मानद वन्यजीवरक्षक