शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘तिथेच’ पुन्हा सापडली १४ जोडपी!तालुका

By admin | Updated: September 7, 2015 20:55 IST

पोलिसांची कारवाई : लुटीच्या घटना घडूनही धोका पत्करण्याची प्रेमिकांची हौस कायम

राजीव मुळ्ये - सातारा  --मैत्रिणीसमवेत फिरायला गेलेल्या युवकाला चाकूचे वार करून लुटल्याची घटना ताजी असताना, त्याच परिसरात जाणाऱ्या प्रेमिकांचा ओघ काही आटलेला नाही. लुटीच्या घटनेनंतर पोलिसांनी वारंवार केलेल्या कारवाईत आतापर्यंत चौदा जोडपी त्याच ठिकाणी आढळली असून, त्यांना पोलिसांनी समज देऊन सोडून दिले. ‘लोकमत’ने दि. १० जुलैच्या अंकात ‘माझिया प्रियाला धोका कळेना..’ या शीर्षकाखाली शहराच्या आसपासची धोकादायक ठिकाणे छायाचित्रांसह प्रसिद्ध केली होती. प्रेमिकांना फिरायला जाण्यास हक्काची ठिकाणे फारशी नाहीत, हे खरे असले तरी त्यासाठी धोका पत्करणे आणि नंतर पश्चात्तापाची वेळ येणे योग्य नसल्याने खबरदारी घेणेच योग्य ठरते. ‘लोकमत’च्या वृत्तांतात शाहूपुरी-कोंडवे रस्ता, यवतेश्वर रस्ता, महामार्गालगतचा वाढे रस्ता अशा अनेक धोकादायक ठिकाणांची आणि तेथे पूर्वी घडलेल्या घटनांची माहिती दिली होती. त्यातीलच एका ठिकाणी दि. २ सप्टेंबर रोजी लुटीची आणखी एक घटना घडली. या घटनेची नोंद पोलीसदफ्तरी झाली आहे.या घटनेनंतर तालुका पोलिसांनी धोकादायक ठिकाणांची सायंकाळनंतर कसून पाहणी सुरू केली. जोडीने फिरायला जाणे हा गुन्हा नसला तरी सार्वजनिक ठिकाणी आक्षेपार्ह वर्तन करणे कायदेशीर ठरत नाही. काही जोडप्यांनी सार्वजनिक ठिकाणच्या वर्तनाची सीमारेषा ओलांडली होती, असे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे पकडण्यात आलेल्या जोडप्यांवर मुंबई पोलीस अ‍ॅक्टनुसार प्रतिबंधात्मक कारवाई करणे पोलिसांना भाग पडले. फिरायला जाणाऱ्यांमध्ये जशी अविवाहित, विद्यार्थिदशेतील जोडपी असतात, तशीच विवाहित जोडपीही आढळून येतात. गुन्हेगारी वृत्तीच्या व्यक्तींचा अशा ठिकाणांवर नेहमीच डोळा असतो. धाक दाखवून रोकड, दागिने, मोबाइल लुटण्याच्या अनेक घटना घडतात. अनेकदा आपले गुपित उघड होण्याच्या भीतीने त्यांची नोंद पोलीसदफ्तरी केली जात नाही. जोडप्यातील मुलीच्या सुरक्षेलाही धोका पोहोचल्याची उदाहरणे घडतात. परंतु अजूनही एखाद्या लुटीच्या घटनेनंतर चारच दिवसांत त्याच ठिकाणी १४ जोडपी आढळतात, हेच आजचे वास्तव आहे.महामार्गाला समांतर वाढे गावच्या हद्दीत असणारा रस्ता जितका खतरनाक बनला आहे, तशीच इतरही अनेक ठिकाणे आहेत. पश्चिमेकडील डोंगराळ भाग, कोंडवे रस्त्यावरील ओढ्याचा परिसर एकट्या जोडप्यासाठी सुरक्षित राहिलेला नाही. त्यामुळे युवकांनी जबाबदारीने वागून धोका टाळावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. समुपदेशनाचीही जबाबदारी...आडबाजूला, सार्वजनिक ठिकाणी, धोक्याच्या ठिकाणी आढळून आलेल्या १४ जोडप्यांवर पोलिसांनी नियमानुसार कारवाई केली असली, तरी पोलिसांना त्याहीपलीकडे जाऊन जबाबदारी पार पाडावी लागत आहे. आपले बिंग फुटल्याने विशेषत: मुलींची मन:स्थिती बिघडू शकते. एखादी मुलगी टोकाचा निर्णय घेऊ शकते. त्यामुळे अशा जोडप्यांचे समुपदेशन करण्याची जबाबदारी पोलिसांना पार पाडावी लागत आहे. आपण गैरवर्तन केल्याबद्दल अपराधीपणाची भावना या जोडप्यांच्या मनात येऊ नये आणि संभाव्य धोक्यांची जाणीवही व्हावी, असा प्रयत्न पोलिसांकडून केला जात आहे.