शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

फलटण शहरात ३२ ठिकाणी ७४ कॅमरे

By admin | Updated: February 5, 2016 00:58 IST

‘सेफ सिटी’ योजनेत समावेश : रामराजे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय

फलटण : राज्य शासनाच्या सेफ सिटी योजनेत फलटण शहराचा समावेश करून त्यासाठी नाविण्यपूर्ण योजना व अन्य ठिकाणाहून निधीची तरतूद करण्यासंबंधी सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर शहरातील ३२ ठिकाणे निश्चित करून तेथे ५२ फिक्स व २२ फिरते सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. मुंबईत बुधवारी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी गृहविभागाचे उपसचिव कैलास गायकवाड, फलटणचे उपविभागीय अधिकारी रमेश चोपडे, जिल्हाधिकारी कार्यालयातील सहायक नियोजन अधिकारी पाटील, फलटणचे मुख्याधिकारी यशवंत डांगे, शहर अभियंता मारुती पाटील उपस्थित होते. फलटण शहराचा वाढता विस्तार, वाढते औद्योगिक क्षेत्र, व्यापारातील वाढ, वाढत्या शैक्षणिक सुविधा यामुळे शहराच्या लोकसंख्येत भर पडत आहे. नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्ती, अपघातात वेळेवेर वैद्यकीय व इतर सुविधा उपलब्ध झाली पाहिजे, यावर या बैठकीत चर्चा झाली. त्यावर उपाययोजना करण्यासाठी तीन कोटी रुपये खर्चाची प्राथमिक स्वरूपाची योजना स्वीकारण्यात आली. मुख्याधिकारी, पोलीस अधिकारी व सुरक्षा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून सुरक्षिततेबाबत तयार केलेल्या अहवालावर या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यानुसार शहरातील ३२ ठिकाणे निश्चित करून ५२ स्थिर तर २२ फिरते सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे. आपत्ती किंवा वाहतूक अथवा एखाद्या उत्सवातील मिरवणुकीदरम्यान सहभागी नागरिकांना सूचना देण्यासाठी किंवा घटनेची माहिती देण्यासाठी शहरातील काही मोक्याच्या जागेवर ध्वनीवर्धक लावणे. शहरातील रुग्णालये, रुग्णवाहिका व स्वयंसेवी संस्था यांचे संपर्क क्रमांक व त्यांच्याकडून होऊ शकणाऱ्या अपेक्षित मदतीबाबत माहिती संकलित करून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. (प्रतिनिधी)