शहरं
Join us  
Trending Stories
1
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
2
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
3
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
4
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
5
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
6
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
7
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
8
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
9
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
10
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
11
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
12
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
13
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
14
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
15
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
16
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
17
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
18
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
19
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
20
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?

रुग्णाच्या जीवापेक्षा त्यांची घाई महत्त्वाची!

By admin | Updated: May 19, 2016 00:10 IST

समर्थ मंदिर चौक : सायरन वाजवणाऱ्या रुग्णवाहिकेला थांबावे लागतंय रस्त्याची वाट पाहत

सातारा : धकाधकीच्या जीवनात कधी कोणावर कोणती वेळ येईल, याचा नेम नाही. अशा रुग्णांना काही वेळेत रुग्णालयात पोहोचविण्याचे काम रुग्णवाहिका करत असतात. परंतु रुग्णवाहिकेसाठी रस्ता मोकळा करून देण्याचा सुज्ञपणा अद्याप तरी सातारकरांमध्ये आलेला दिसत नाही. समर्थ मंदिर ते ढोल्या गणपती या दरम्यानचा रस्ता ओलांडण्यासाठी रुग्णवाहिकेला कित्येक वेळ थांबावे लागले.सातारकरांचा उर भरून येईल, अशी घटना या आठवड्यात घडली होती. वाई येथील व्यापारी चंपालाल ओसवाल यांचा मुलगा मनीष (वय ३०) हा मंगळवारी रात्री दुचाकी घसरल्याने जखमी झाला. त्याच्या मेंदूला मार लागल्याने सुरुवातीला साताऱ्याच्या रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्याला पुण्याच्या रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथील डॉक्टरांनी सांगितलं, ‘पेशंट जगणं अवघड आहे.’ तेव्हा काळजावर दगड ठेवून त्याच्या आईनं निर्णय दिला, ‘ माझ्या मुलाचं हृदय, लिव्हर, किडनी, हात अन् डोळे दान करा !’... त्याच्या मृत्यूनंतर हृदय काढून तत्काळ मुंबईला पाठविण्यात आलं. त्यामुळे अनेक रुग्णांच्या रूपाने मनीष अजरामर झाला आहे. त्याचवेळी मनीषचं हृदय पुण्याहून मुंबईला १८० किलोमीटरचं अंतर अवघ्या दीड तासात नेण्यात आलं. मिनिटांना दोन किलोमीटरचा प्रवास करून रुग्णवाहिकेने मोलाचे काम केले होते. त्यामध्ये वाहतूक शाखेनेही महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली होती. या घटनेतून तरी सातारकरांनी स्वयंशिस्त लावून घेण्याची गरज होती. सातारा येथील समर्थ मंदिर परिसर हा नेहमीच गजबजलेला असतो. त्यामुळे ‘लोकमत’ने पुढाकार घेऊन तेथील एसटीचा थांबा पुढे हलविला आहे. आता काही अंशी ताण कमी झाला आहे. याच ठिकाणी मंगळवारी सायंकाळी एक रुग्णवाहिका बोगद्याच्या दिशेने मोठ-मोठ्याने सायरन वाजवत येत होती. त्या सायरनचा आवाज किमान सातशे-आठशे मीटरवर ऐकू येत होता. या आवाजाने काही वाहने बाजूला झाली; परंतु,समर्थ मंदिराजवळ रस्त्याच्या कडेलाच गाड्या उभ्या करून गप्पा मारत थांबलेल्यांना याचं गांभीर्य समजलंच नाही. रुग्णवाहिका त्यांच्याजवळ आली तरी गाडीवरून उतरून ती बाजूला घेण्याचं कष्ट घेण्यात आले नाही. सारेजण त्यांच्याकडे पाहू लागले तेव्हा मोटारसायकल थोडीशी तिरकी करून रस्ता दिला. तेथून थोडी पुढे गेली, तर एका कारला मंगळवार पेठेकडे जायचे असल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती. त्यामुळे रुग्णवाहिकेला थांबावे लागले. सर्वात दुर्दैवी घटना ढोल्या गणपतीच्या अलीकडे घडली. त्याठिकाणी पालिकेकडून आलेल्या वाहनाला राजवाड्याकडे जायचे होते. दुसरे वाहन राजवाड्याकडून येऊन पालिकेकडे जाण्यासाठी वळण घेत होती. दोन्ही वाहने आमनेसामने आल्याने इतर वाहने थांबली होती. त्यातून वाट काढून रुग्णवाहिका काही वेळेत या वाहनांजवळ आली. रुग्णवाहिकेचा वेग कमी झालेला पाहून राजवाड्याकडून आलेल्या दुचाकीस्वाराने बोगद्याकडे जाण्यासाठी जीप व रुग्णवाहिका या दोन वाहनांच्या मधून रस्ता काढण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी समोरील वाहने निघून गेले; पण दुचाकी बाजूला जाईपर्यंत रुग्णवाहिकेला वाट पाहावी लागली. विशेष म्हणजे, तोपर्यंत सायरन वाजतच होता. आपले काम कितीही महत्त्वाचे असले तरी सायरन वाजवत येत असलेल्या वाहनांना प्राधान्याने वाट काढून देण्याची जबाबदारी प्रत्येक वाहनचालकाची आहे. वाहनचालकांनी सुज्ञपणा दाखविण्याची गरज निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)कितीही गर्दी असली, सिग्नल पडलेला असला तरी प्रसंगी हाताने वाहतूक थांबवून रुग्णवाहिकेला प्राधान्य देण्याच्या सूचना वाहतूक शाखेच्या पोलिसांना केल्या आहेत. चौकात रस्ता देण्याबाबत सर्वसामान्यांमध्ये जनजागृती होणे गरजेचे आहे. त्यासाठी शाळा-महाविद्यालयांतून प्रबोधन केले जाईल.- सूरज घाडगे, सहायक पोलिस निरीक्षक,वाहतूक शाखा, साताराहोऊ नये, ‘लांडगा आला रे...’रुग्ण नसतानाही काही रुग्णावाहिकांचे चालक चौकातून लवकर मार्ग निघावा म्हणून सायरन वाजवत जात असतात, असा तक्रारीचा सूर काही वाहनचालकांमधून येत आहे. त्यामुळे अनेकदा अशा रुग्णवाहिकांकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे रुग्णवाहिकांच्या चालकांनी आवश्यक तेव्हाच सायरनचा वापर करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अन्यथा ‘लांडगा आला रे...’ अशी अवस्था होऊ शकते. अतिगंभीर रुग्ण असायचा; पण रिकामीच असेल, असा समज करून ती अडकून बसायला नको.