फलटण : पवारवाडी (ता. फलटण) येथील एका घरातील कडी-कोयंडा अज्ञात चोरट्यांनी उचकटून आत प्रवेश करून १५ लाख ८५ हजारांचा ऐवज चोरून नेला.
चंद्रकांत दत्ताजीराव पवार (रा. पवारवाडी) यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. १९ रोजी रात्री दीड ते पहाटे साडेपाचच्या दरम्यान पवारवाडी येथील त्यांच्या घराच्या पाठीमागील किचन रूम शेजारील खोलीच्या दरवाजाचा आतील कडी-कोयंडा काढून चोरट्यांनी कपाटातील तीन वेगवेगळ्या पर्समध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने व चार लाख रुपयांची रोख रक्कम असा एकूण १५ लाख ८० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी भेट देऊन पाहणी केली. अधिक तपास पोलीस निरीक्षक नितीन सावंत करीत आहेत.