शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

कुत्री मोकाटच; अडीच वर्षात ५२ हजार लोकांवर हल्ला! १० जणांचा मृत्यू 

By नितीन काळेल | Updated: September 13, 2024 22:19 IST

घराच्या संरक्षणासाठी कुत्रा पाळण्यात येतो. मोठे बंगले, घरी असणाऱ्या कुत्र्यांची काळजी घेण्यात येते. त्यासाठी आवश्यक लसीकरण करण्यात येते. पण, मोकाट कुत्र्यांच्याबाबत असे होत नाही.

सातारा : सातारा शहरात पिसाळलेल्या कुत्र्याने ३३ जणांना चावा घेतल्याची घटना आता घडली असलीतरी मागील अडीच वर्षांत जिल्ह्यातील ५२ हजारांवर नागरिकांवर कुत्र्यांचा हल्ला झालाय. त्यातील १० जणांचा मृत्यू झाला आहे. यातील चावा घेणारी बहुतांश कुत्री भटकीच आहेत. त्यामुळे कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाचा विषय पुन्हा एेरणीवर आला आहे.             घराच्या संरक्षणासाठी कुत्रा पाळण्यात येतो. मोठे बंगले, घरी असणाऱ्या कुत्र्यांची काळजी घेण्यात येते. त्यासाठी आवश्यक लसीकरण करण्यात येते. पण, मोकाट कुत्र्यांच्याबाबत असे होत नाही. तसेच त्यांच्या वाढीवरही नियंत्रण राहत नाही. या कुत्र्यांकडूनच अधिक करुन नागरिक, जनावरांवर हल्ले होतात. यामुळे नागरिकांना जीव गमवावा लागल्याच्या घटनाही पुढे येतात. आताही सातारा शहरात तब्बल ३३ नागरिकांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतलाय. यामुळे घबराटीचे वातावरण आहे. पण, मागील काही वर्षातील आकडेवारी विचारात घेता कुत्र्यांच्या हल्ल्याच्या प्रमाणात वाढ झालेली आहे. यामुळे चिंता करण्यासारखीच स्थिती आहे.जिल्ह्यामधील कुत्र्यांच्या चाव्याची आकडेवारी समोर आलेली आहे. त्यानुसार मागील अडीच वर्षांच्या काळात तब्बल ५२ हजार ६७६ नागरिकांना कुत्र्याने चावा घेतलाय. हे प्रमाण नक्कीच अधिक आहे. तर त्यापूर्वी २०१७ या वर्षात १६ हजार १३१, २०१८ या वर्षात २१ हजार ६८ नागरिकांवर हल्ला केल्याची नोंद आहे. तर २०१९, २० या दोन वर्षात हल्याचे प्रमाण वाढलेले होते. ०१९ मध्ये २६ हजार ३९२ तर २०२० मध्ये २६ हजार २५७  जणांना चावा घेतला आहे.२० पशुगणनेनुसार नोंद...भटके श्वान संख्या - ३६,३६१पाळीव श्वान - ४५,१७१तालुकानिहाय कुत्रा चावा१ जानेवारी २०२२ ते ३१ आॅगस्ट २०२४जावळी १६१७कऱ्हाड ७५४५खंडाळा ३४९५खटाव ५५९०कोरेगाव ४३६६महाबळेश्वर १४८२माण ५६९५पाटण ३८१४फलटण ७७१८सातारा ७००८वाई ४३४६ 

टॅग्स :dogकुत्रा