शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

यशवंतराव चव्हाण यांच्यापासून परंपरा : बाबासाहेब भोसले, पृथ्वीराज चव्हाण अन् एकनाथ शिंदे यांनाही मान

By नितीन काळेल | Updated: June 15, 2025 14:48 IST

सातारा जिल्ह्याने देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिले. तसेच जिल्हा महाराष्ट्राच्या राजकारणातही अग्रेसर राहिलाय.

नितीन काळेल

सातारा जिल्ह्याने देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिले. तसेच जिल्हा महाराष्ट्राच्या राजकारणातही अग्रेसर राहिलाय. त्यामुळे जिल्ह्याने राज्याला आतापर्यंत एक-दोन नाही तर चार मुख्यमंत्री दिले आहेत. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यापासून सुरू झालेली परंपरा बाबासाहेब भोसले, पृथ्वीराज चव्हाण ते एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचली आहे.

सातारा जिल्ह्यातील यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले होते. महाराष्ट्राची निर्मिती १ मे १९६० ला झाली. या दिवसापासून ते १९ नोव्हेंबर १९६२ पर्यंत मुख्यमंत्रिपदी होते. चव्हाण हे कऱ्हाड विधानसभा मतदारसंघातून निवडून येत होते. त्यावेळी चीनने भारतावर आक्रमण केले होते. तेव्हा तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी यशवंतराव चव्हाण यांना दिल्लीत बोलवून घेतले. त्यामुळे हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला, असे वर्णन करण्यात आले. यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय राजकारणात गेले तरी त्यांची महाराष्ट्रावर पकड होती. तर बॅरिस्टर बाबासाहेब भोसले यांच्यामुळे सातारा जिल्ह्याला दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपद मिळाले. जानेवारी १९८२ मध्ये बॅरिस्टर ए. आर. अंतुले हे काही कारणाने मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाले. तेव्हा पक्षाने बाबासाहेब भोसले यांना संधी दिली. भोसले हे मुंबईतील त्यावेळच्या नेहरूनगर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. पण, त्यांना अल्पकाळ मुख्यमंत्रिपदी राहता आले. २१ जानेवारी १९८२ ते १ फेब्रुवारी १९८३ असा त्यांचा कार्यकाल राहिला. बाबासाहेब भोसले हे मुळेच खटाव तालुक्यातील कलेढोण गावचे.

२००९ मध्ये राज्यात आघाडी सरकार सत्तेवर होते. त्यावेळी काही कारणाने मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना पायउतार व्हावे लागले. त्यामुळे कऱ्हाडच्या पृथ्वीराज चव्हाण यांना काँग्रेसने मुख्यमंत्रीपद दिले. चव्हाण हे विधानसभा किंवा विधान परिषदेचे सदस्यही नव्हते. नंतर ते विधान परिषदेत निवडून गेले. चव्हाण हे महाराष्ट्राचे २१ वे मुख्यमंत्री ठरले. तर १० नोव्हेंबर २०१० ते २६ सप्टेंबर २०१४ असा त्यांचा कार्यकाल राहिला. चव्हाण हे सातारा जिल्ह्याचे तिसरे मुख्यमंत्री ठरले. तीन वर्षांपूर्वी शिवसेनेत उठाव झाला. एकनाथ शिंदे भाजपबरोबर जाऊन मुख्यमंत्री झाले. जवळपास अडीच वर्षे ते मुख्यमंत्रिपदी राहिले. ते ठाण्यातील कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून निवडून येतात. पण, ते मूळचे महाबळेश्वर तालुक्यातील दरे तर्फ तांब गावचे आहेत. ते गावाला नेहमीच येतात. एकनाथ शिंदे यांच्यामुळे सातारा जिल्ह्याला चाैथ्यांदा मुख्यमंत्रीपद मिळाले आहे.

तिघे काँग्रेसचे; एक सेनेचा, पण पूर्ण वेळ नाही...

सातारा जिल्ह्याने चार मुख्यमंत्री राज्याला दिले. यातील तिघे राष्ट्रीय काँग्रेसचे होते. तर एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री होते. पण, या चाैघांनाही पूर्ण पाच वर्षे मुख्यमंत्रीपद मिळालेले नाही.

शरद पवारही सातारा जिल्ह्यातील...

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे बारामतीचे. त्यांनीही चार वेळा मुख्यमंत्रीपद मिळवले. पण, पवार हे मूळचे सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्याच्या नांदवळ गावचे. यामुळे सातारा जिल्ह्याला सर्वाधिक मुख्यमंत्री मिळाले, असेच म्हणावे लागेल.