शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Phaltan Doctor Death: शूरांच्या साताऱ्यातील लोकप्रतिनिधींचे ‘मौन’; संवेदनशीलतेपेक्षा राजकारण झाले महत्त्वाचे

By सचिन काकडे | Updated: November 3, 2025 16:25 IST

चिखलफेक करण्यात रस

सचिन काकडेसातारा : फलटण येथे घडलेल्या महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या निंदनीय घटनेने अवघे समाजमन हेलावले आहे. तरीही या गंभीर विषयावर साताऱ्यातील लोकप्रतिनिधींनी बाळगलेले मौन अत्यंत धक्कादायक आहे. हे मौन पाहून शूरांच्या जिल्ह्यात संवेदनशीलता हरवली आहे की, त्यांना फक्त राजकारणच महत्त्वाचे वाटते, असा संतप्त प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.ऐतिहासिक वारसा लाभलेल्या सातारा जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या फलटण येथील डॉक्टर महिलेच्या आत्महत्येने संपूर्ण राज्यात खळबळ माजली. या गंभीर आणि क्लेशकारक घटनेची दखल घेत विविध सामाजिक संस्था आणि संघटना आक्रमक झाल्या. या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी व्हावी, या मागणीसाठी मंत्रालयाबाहेर आंदोलने झाली, पीडित महिलेच्या गावात निषेध मोर्चे निघाले. राज्यभरातील राजकीय व्यक्तींनीही या घटनेचा तीव्र निषेध करत दुःख व्यक्त केले.या सगळ्या घडामोडींमध्ये एक अत्यंत खटकणारी बाब समोर आली आहे, ती म्हणजे सातारा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचे मौन. खासदार उदयनराजे भोसले यांचा अपवाद वगळता जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना हा विषय गांभीर्याचा वाटत नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. या प्रकरणावर प्रतिक्रिया तर दूरच; पण किमान त्याची सखोल चौकशी व्हावी, अशी साधी मागणी करण्याची संवेदनशीलता कोणी दाखवलेली नाही.

चिखलफेक करण्यात रस...विशेष म्हणजे, ज्या फलटण तालुक्यात ही घटना घडली, त्याच तालुक्यात मूळ विषयाला बगल देत या विषयाचे गलिच्छ राजकारण सुरू झाले आहे. पीडितेला न्याय मिळण्याऐवजी, लोकप्रतिनिधी एकमेकांवर चिखलफेक करत आहेत आणि जुने वाद व वादाची प्रकरणे नव्याने समोर आणली जात आहेत.

नागरिकांनाच पडले प्रश्न?

  • या सर्व घडामोडी पाहता साताऱ्यातील लोकप्रतिनिधींची संवेदनशीलता नेमकी कुठे हरपली आहे?
  • इतक्या संवेदनशील प्रश्नावर व्यक्त न होणे, हे सातारकरांच्या पचनी पडलेले नाही.
  • श्रेयवादासाठी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडणारे लोकप्रतिनिधी गप्प का आहेत.
  • राजकारण बाजूला ठेवून सर्वपक्षीय नेते निष्पक्ष तपासाची मागणी का करीत नाहीत.
English
हिंदी सारांश
Web Title : Phaltan Doctor Death: Satara leaders' silence over tragedy raises questions.

Web Summary : Satara leaders face criticism for their silence on the Phaltan doctor's suicide. Only MP Udayanraje Bhosale spoke up, while others prioritize political squabbles over justice and investigation. Citizens question their lost sensitivity.