शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

किरपेतील बिबट्या अखेर वनविभागाच्या पिंजऱ्यात; ग्रामस्थांना सुगावा लागण्यापूर्वीच बिबट्याला अन्यत्र हलवले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2022 12:38 IST

मलकापूर  : किरपे ता. कराड येथे वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात आज बिबट्या अखेर जेरबंद झाला. २६ जानेवारी रोजी पहाटे ही बाब ...

मलकापूर  : किरपे ता. कराड येथे वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात आज बिबट्या अखेर जेरबंद झाला. २६ जानेवारी रोजी पहाटे ही बाब निदर्शनास आली. त्यानंतर ग्रामस्थांना सुगावा लागण्यापूर्वीच वनविभागाने तात्काळ बिबट्याला ताब्यात घेत अन्यत्र हलवले आहे.    किरपे ता. येथील गुरुवारी २० रोजी सायंकाळी किरपे येथील शेतात बिबट्याने राज धनंजय देवकर या ५ वर्षाच्या चिमुरड्यावर हल्ला केला होता. यावेळी त्यांचे वडील धनंजय देवकर यांनी प्रसंगावधान दाखवत बिबट्याला प्रतिकार केल्याने ते बिबट्याच्या तावडीतून मुलाचा प्राण वाचवण्यात यशस्वी झाले. त्यानंतर वनविभागाने तात्काळ हालचाली गतिमान करत परिसरात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला होता. मात्र, बिबट्याने पिंजऱ्याला एक-दोन वेळा गुंगारा दिल्याचे दिसून आले. बिबट्याने लहान मुलावर हल्ला केल्याच्या दोन दिवसानंतरच परिसरात शनिवारी २२ रोजी ऊसतोड मजुरांना बिबट्याचे पुन्हा दर्शन झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.  त्यामुळे वनविभागाने लवकरात लवकर बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात होती.

मोवटी नावाच्या शिवारात नारायण मंदिराजवळ वनविभागाने लावलेल्या पिंजर्‍यात बुधवारी २६ जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास बिबट्या जेरबंद झाला आहे. त्यानंतर वनविभागाने घटनास्थळी ग्रामस्थ विद्याधर देवकर, आनंदा देवकर, पोलीस पाटील प्रवीण तिकवडे यांना बोलावून घेतले. बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला असल्याचे दाखवले. त्यानंतर इतर ग्रामस्थांना याबाबतची कल्पना येण्याआधीच ग्रामस्थांचा उद्रेक टाळण्याच्या हेतूने वनविभागाने बिबट्याला अन्यत्र हलवले आहे. बिबट्या जेरबंद झाल्याने ग्रामस्थांनी ही सुटकेचा निश्‍वास सोडला आहे.