शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

तहसील कार्यालय परिसरात अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न

By admin | Updated: April 28, 2017 18:09 IST

टंचाई काळात २०१२ मध्ये पिण्याच्या पाण्याच्या टँकरमध्ये आर्थिक घोटाळा झाला. वरिष्ठांना कळवूनही कारवाई होत नाही, असा आरोप करून मानवाधिकार संघटनेचे तालुकाध्यक्ष सदाशिव निकम

आॅनलाइन लोकमत
वडूज (सातारा), दि. 28 -  टंचाई काळात २०१२ मध्ये पिण्याच्या पाण्याच्या टँकरमध्ये आर्थिक घोटाळा झाला. वरिष्ठांना कळवूनही कारवाई होत नाही, असा आरोप करून मानवाधिकार संघटनेचे तालुकाध्यक्ष सदाशिव निकम यांनी शुक्रवारी दुपारी अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला. दरम्यान, संघटनेच्या पदाधिका-यांनी महसूल कार्यालयाला बाहेरून कड्या लावल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 
याबाबत माहिती अशी की, २०१२ च्या टंचाई परिस्थितीत खटाव तालुक्यातील गावांना टँकरने पाणीपुरवठा केला. त्यामध्ये संबंधित अधिका-यांनी भ्रष्टाचार केला असून, पाच वर्षांपासून अनेक तक्रारी करूनही प्रशासनाने कोणतीही दखल न घेता अधिका-यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. तसेच तत्कालीन उपविभागीय अधिकारी व ठेकेदारांविरुद्ध लेखी तक्रार होती. उपविभागीय अधिका-यांची चौकशी वरिष्ठ अधिका-यांनी करणे गरजेचे होते. परंतु या प्रकरणात त्यांची चौकशी करण्यासाठी नायब तहसीलदारांची नियुक्ती केली. त्यांनी चौकशी न केल्याने पुन्हा तहसीलदारांची नियुक्ती केली. कसलीही चौकशी न करता प्रकरण दडपण्याचा प्रशासन प्रयत्न झाल्याचा आरोप सदाशिव निकम यांनी केला आहे. 
तसेच त्या वर्षात पाणीपुरवठा करणा-या टँकरचे मालक सदाशिव निकम असताना त्यांच्याकडून कोणतीही कागदपत्रे न घेता तो टँकर पाणी वाहतुकीत लावला. त्याकाळी संबंधित ठेकेदार व तत्कालीन प्रांताधिका-यांनी वाहने पाणीपुरवठ्यावर लावली. या वाहतुकीच्या बिलापोटी लाखो रुपयांची बिले काढली. याबाबत गेल्या पाच वर्षांपासून कागदोपत्री तक्रारी करूनही कोणतीही कारवाई न झाल्याने निकम यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे.
 
कार्यालयास बाहेरून कड्या
निकम यांनी अचानक आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्याचवेळी निकम यांचे मित्र व संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तहसीलदार कार्यालयाच्या दारांच्या कड्या लावून निषेध केला. त्यामुळे प्रशासनाची पळापळ झाली.