शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

दहा वर्षांपासून सलीमभार्इंच्या अंगणात तहानलेल्या गायी तृप्त !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 23:57 IST

जावेद खान ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : उन्हाचा पारा वाढला की मोकाट फिरणाऱ्या जनावरांची पावले कमानी हौद परिसरातील बेकरीकडे वळतात. आडोशाला येऊन उभ्या राहिलेल्या या जनावरांना एक दशकापूर्वी त्यांनी पहिल्यांदापाणी पाजले. त्यानंतर मोकाट जनावरांचे व त्यांचे ‘पाणीदार’ नाते घट्ट झाले. गेल्या दहा वर्षांत अनेक वेळेला मुक्या प्राण्यांना पाणी देण्याचा कित्ता त्यांच्या ...

जावेद खान ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : उन्हाचा पारा वाढला की मोकाट फिरणाऱ्या जनावरांची पावले कमानी हौद परिसरातील बेकरीकडे वळतात. आडोशाला येऊन उभ्या राहिलेल्या या जनावरांना एक दशकापूर्वी त्यांनी पहिल्यांदापाणी पाजले. त्यानंतर मोकाट जनावरांचे व त्यांचे ‘पाणीदार’ नाते घट्ट झाले. गेल्या दहा वर्षांत अनेक वेळेला मुक्या प्राण्यांना पाणी देण्याचा कित्ता त्यांच्या अनुपस्थितीत त्यांचे कुटुंबीयही गिरवितात, हे विशेष!येथील कमानी हौद परिसरात रिक्षा स्टॉपशेजारी सलीम शेख यांची बेकरी आहे. या बेकरीच्या बाहेर पूर्वी नळ होता. नळाला पाणी आल्याची माहिती मिळावी म्हणून या नळाखाली स्टीलची बादली ठेवली जातहोती.सुमारे दहा वर्षांपूर्वी भल्या सकाळी एक गाय आणि खोंड त्या रिकाम्या बादलीत तोंड घालू लागले. हे पाहून शेख यांनी बादलीत पाणी ओतले. गाय आणि खोंड यांनी पाणी पिले आणि तेथून निघून गेले. त्यानंतर गेल्या दहा वर्षांत शेकडोमोकाट कुत्री, गाय, खोंड, बैल यांनी शेख यांच्याबरोबर नाते निर्माण केले.गेल्या दहा वर्षांपासून पाणी प्यायच्या तीन वेळा !रात्री आडोशाला बसलेली ही मोकाट जनावरे सकाळी उजाडले की सहा-साडेसहाच्या सुमारास मार्गस्थ होतात. सलीम शेख सकाळी सहा वाजता बेकरी उघडतात. त्यामुळे ही मोकाट जनावरे सकाळी सहा ते साडेसहादरम्यान येथे पाणी पिण्यास येतात. त्यानंतर सकाळी दहा आणि बारा यावेळेत मोकाट जनावरे येथे येतात. दिवसभरात साधारण दहा बादल्या पाणी त्यांना यासाठी लागते. पाणी प्यायला येणारी जनावरे शेख पाणी देत नाहीत तोवर बेकरीच्या भिंतीला टेकून उभे राहतात. बादलीत पाणी ओतले की पाणी पिऊन ते निघून जातात. उन्हाची तीव्रता अधिक असेल तर संध्याकाळी चारच्या सुमारासही या जनावरांचा एक फेरफटका त्यांच्याकडे होतो. ही जनावरे वर्षभर त्यांच्याकडे येऊन पाणी पितात. हे प्रमाण उन्हाळ्याच्या दिवसांत वाढते.