शहरं
Join us  
Trending Stories
1
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
2
राजा रघुवंशी यांचा मृत्यू, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
3
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
4
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
5
सावधान! कोरोना हातपाय पसरतोय, देशभरात ६०००हून अधिक रुग्ण; २४ तासांत 'इतक्या' लोकांचा मृत्यू
6
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
7
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
8
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
9
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
10
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
11
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
12
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
13
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
14
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
15
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
16
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
17
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
18
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
19
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
20
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण

दहा दिवसांच्या बाप्पांना डॉल्बीमुक्त निरोप !

By admin | Updated: September 15, 2016 00:02 IST

गणेश भक्तांचा अलोट उत्साह : प्रशासनाची करडी नजर; आजच्या विसर्जन सोहळ्यासाठी कडक बंदोबस्त

सातारा : साताऱ्यासह कऱ्हाड, वाई शहरांमध्ये दहा दिवसांच्या घरगुती तसेच सार्वजनिक गणेशमूर्तींना निरोप देण्यात आला. सातारा शहरात डॉल्बीमुक्त मिरवणुका निघाल्या. ढोल-ताशे, लेझीम अशा पारंपरिक वाद्यांच्या गजरात साताऱ्याच्या संस्कृतीला शोभेल अशी मिरवणूक पाहण्यासाठी शहरातील गणेश भक्तांनी गर्दी केली होती. सातारा शहरात बुधवारी २५ मोठ्या गणेशमूर्तींना निरोप देण्यात आला. गुरुवारी ७३ सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाणार आहे.पालिका व पोलिस प्रशासनाची या मिरवणुकांवर करडी नजर होती. नियम तोडणाऱ्या अतिउत्साही कार्यकर्त्यांना बुधवारी अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय पवार यांनी गुन्हा दाखल करण्याची तंबी दिली. पालिकेने तयार केलेल्या प्रतापसिंह शेती फार्म, गोडोली बाग, हुतात्मा उद्यान, दगडी शाळा आदी ठिकाणच्या कृत्रिम तलावांमध्ये गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी सार्वजनिक मंडळांची लगबग सुरू झाली असून, मंगळवारी शहरातील आठ मंडळांनी विजर्सन केले तर बुधवारी २५ मंडळांनी आपल्या लाडक्या बाप्पांना निरोप दिला. अनंत चतुर्दशीदिवशी गुरुवार, दि. १५ रोजी ७३ सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाणार आहे. विसर्जन कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. एक अतिरिक्त पोलिस अधीक्षक, सात पोलिस उपअधीक्षक, २२ पोलिस उपनिरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक आणि पोलिस उपनिरीक्षक ८०, पोलिस कर्मचारी १७५७, होमगार्ड ५३५, एसआरपीएफचे दोन प्लाटून, दोन क्यूआरटी तुकडी, दोन आरसीपी आणि चार स्ट्रायकिंग फोर्सच्या तुकड्या असा मोठा फौजफाटा ठेवण्यात आला होता.(प्रतिनिधी)आज खरी कसरतसातारा शहरातील बहुतांश सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन राधिका रस्त्यावर तयार करण्यात आलेल्या कृत्रिम तलावात होत आहे. पालिका कर्मचारी, पोलिस या ठिकाणी सेवा बजावत आहेत. अतिउत्साहात कोणी तलावात पडण्याची शक्यता असल्याने लाईफगार्ड नजर ठेवून आहेत. विसर्जनाचा (गुरुवार) मुख्य दिवस असल्याने हे कर्मचारी डोळ्यात तेल घालून विसर्जनस्थळी थांबणार आहेतकऱ्हाडात बाप्पाचीथाटात मिरवणूककऱ्हाड : शहरात अनंत चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला बुधवारी सायंकाळी शहरातील काही छोट्या-मोठ्या गणेश मंडळांनी मोठ्या थाटामाटात गणेशमूर्तींचे विसर्जन केले. यावेळी कऱ्हाड पंचायत समितीमध्ये बसविण्यात आलेल्या गणेशमूर्तींचे कर्मचाऱ्यांनी ढोल-ताशांच्या गजरात वाजतगाजत येथील कृष्णा नदीत विसर्जन केले. कऱ्हाडात नागरिकांनी ‘पर्यावरणपूरक गणेशोत्सव’ या उपक्रमास नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.