शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

आॅक्टोबरमध्ये दहा सुट्यांचा बोनस !

By admin | Updated: October 1, 2014 01:11 IST

नोकरदारांची चंगळ : चौथ्या शनिवारमुळे दिवाळीत सलग चार दिवसांची मजा

सातारा : यंदा दिवाळी थोडी लवकरच आली आहे. ती आॅक्टोबरमध्ये असल्याने सरकारी नोकरदारांची खरी चंगळ या महिन्यात आहे. गांधी जयंती, दसरा, लक्ष्मी पूजन, दिवाळी पाडवा, दुसरा, चौथा शनिवारसह चार रविवार या महिन्यात आल्याने चक्क दहा दिवसांची सुटी मिळणार आहे. व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक आदी सोशल मीडियावर सध्या आॅक्टोबर महिन्यातील सुट्या हा विशेष चर्चेत राहिला आहे. हे मेसेज आठ दिवसांपासून फिरत आहेत. त्यामुळे नोकरदारांचे कधी एकदा हा महिना सुरू होतोय, अशी अवस्था असते. शाळा-महाविद्यालयांना दिवाळीच्या सलग सुट्या असतात. मात्र, इतर नोकरदार व खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना सलग सुट्या मिळत नाहीत. त्यांच्यासाठी हा महिना ‘लकी’ आहे. त्यामुळे अनेकांनी आतापासून सुट्यांचे नियोजन करण्यास सुरुवात केली आहे.महात्मा गांधी जयंती गुरुवार, दि. २ रोजी आहे. या दिवशी सर्व शासकीय कार्यालयांना सुटी असते. मात्र, केंद्र शासनाने या दिवशी कर्मचारी, अधिकाऱ्यांनी कार्यालयात येऊन कार्यालय स्वच्छ करावे. हा दिवस ‘स्वच्छ दिवस’ म्हणून साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, ‘ही सूचना केंद्र सरकारी कार्यालयांना आहे. आपल्याला अजून सूचना आलेल्या नाहीत, त्या आल्यानंतर पाहू यात,’ अशी चर्चा जिल्हा परिषदेसह इतर शासकीय कार्यालयांमध्ये रंगू लागली आहे.गांधी जयंती पाठोपाठ दुसऱ्या दिवशी शुक्रवार, दि. ३ रोजी दसरा आहे. त्यानंतर रविवार, दि. ५ रोजी बकरी ईद आहे. बकरी ईद रविवारी असल्याने आणखी एक सुटी बुडल्याचे दु:ख मात्र काहीना निश्चित झाले आहे. या महिन्यात दिवाळी दि. २३ आक्टोबरपासून प्रारंभ होत आहे. गुरुवार, दि. २३ रोजी लक्ष्मी पूजन, शुक्रवार, दि. २४ रोजी दीपावली पाडवा आहे.या सुट्यानंतर लगेच २५ रोजी चौथा शनिवार असून, दि. २६ रोजी रविवार आहे. त्यामुळे दिवाळीत काही कार्यालयांतील कर्मचाऱ्यांना सलग चार सुट्या मिळणार आहेत. तसेच दि. ५, १२, १९, २६ रोजी रविवार आहेत. एकंदर ३१ दिवसांचा महिना असला तरी केवळ २१ दिवसच काम करावे लागणार आहे. (प्रतिनिधी)