शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्याचा पारा नीच्चांकी; १२ अंशाखाली घसरला, हुडहुडी वाढली

By नितीन काळेल | Updated: January 19, 2024 13:31 IST

शीतलहर कायम; महाबळेश्वरही गारठले

सातारा : जिल्ह्याचा पारा मागील पाच दिवसांपासून घसरत असून शुक्रवारी साताऱ्यात ११.९ किमान तापमानाची नोंद झाली. हे या वर्षातील नीचांकी तापमान ठरले आहे. तर वातावरणात शीतलहर कायम असल्याने नागरिकांना हुडहुडी भरुन येत आहे. त्याचबरोबर थंड हवेचे महाबळेश्वरही गारठले आहे.जिल्ह्यात यावर्षी नोव्हेंबर महिन्यात थंडीचे प्रमाण कमी होते. मात्र, डिसेंबरच्या मध्यानंतर काही दिवस पारा १३ अंशापर्यंत खाली आला होता. तर थंड हवेच्या महाबळेश्वरचे किमान तापमानही १२ अंशापर्यंत खाली आले होते. काही दिवसच पारा घसरला. पण, त्यानंतर तापमान वाढत गेले. परिणामी यंदा थंडीची तीव्रता कमी राहण्याचा अंदाज बांधला जात होता. मात्र, मागील पाच दिवसांपासून किमान तापमानात सतत उतार येत गेला आहे. त्यातच उत्तर भारतात कडाक्याच्या थंडीची लाट आलेली आहे. बर्फवृष्टी होत आहे. यामुळे तेथील जनजीवनावर परिणाम झाला आहे. तशीच परिस्थिती जिल्ह्यात निर्माण झालेली आहे. कारण, उत्तरेकडून थंड वारे वाहत आहेत. यामुळे जिल्ह्यातही शीतलहर आहे. त्यामुळे अंगाला थंडगार वारे झोंबत आहे. परिणामी नागरिकांना ऊबदार कपड्यांचा वापर करावा लागत आहे. जिल्ह्याचा पारा घसरल्यामुळे बाजारपेठ तसेच शेतीच्या कामावरही परिणाम झालेला आहे. यामुळे शहराबरोबरच ग्रामीण भागातही शेकोट्या पेटविण्यात येत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

सातारा शहराच्या पाऱ्यातही घसरण झाली आहे. काही दिवसांपूर्वीच १८ अंशापर्यंत असणारे किमान तापमान चार दिवसांपासून घसरले आहे. त्यातच शुक्रवारी ११.९ अंश किमान तापमानाची नोंद झाली. हे या वर्षातील नीच्चांकी तापमान ठरले. तर या कडाक्याच्या थंडीने सकाळच्या सुमारास फिरणाऱ्या नागरिकांची संख्या कमी झाली आहे. त्याचबरोबर महाबळेश्वरचा पाराही घसरला आहे. १२ अंशादरम्यान तापमान राहत आहे.सातारा शहरात नोंद किमान तापमान...दि. ४ जानेवारी १६.५, ५ जानेवारी १७.२. ६ जानेवारी १७.५, ७ जानेवारी १७.२. दि. ८ जानेवारी १६.६, ९ जानेवारी २०.२, १० जानेवारी १८.१, दि. ११ जानेवारी १७.४, १२ जानेवारी १६.१, १३ जानेवारी १५.५, १४ जानेवारी १५.८, दि. १५ जानेवारी १४.५, १६ जानेवारी १२.४, १७ जानेवारी १३, १८ जानेवारी १२, दि. १९ जानेवारर ११.९

टॅग्स :Mahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थान