शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सांगा.. 'भाऊचा ठेका' घेणार कोण?

By admin | Updated: June 16, 2014 12:18 IST

दुष्काळी माण-खटाव मतदार संघात राजकीय नेत्यांचा मात्र भलताच सुकाळ बुवा.कुणी भाऊ, कुणी तात्या, तर कुणी भैय्या.प्रत्येकालाच वाटतंय, 'म्हसवड-मुंबई गाडीत मीच बसणार!'

'घड्याळबाबा' अस्वस्थ : दोन भाऊ, एक तात्या अन् एक भैय्या लागले कामाला
 
सचिन जवळकोटे■ सातारा
दुष्काळी माण-खटाव मतदार संघात राजकीय नेत्यांचा मात्र भलताच सुकाळ बुवा.कुणी भाऊ, कुणी तात्या, तर कुणी भैय्या.प्रत्येकालाच वाटतंय, 'म्हसवड-मुंबई गाडीत मीच बसणार!' ..पण या सर्वांसमोर एकच प्रश्न उभा ठाकलाय. तो म्हणजे 'भाऊचा ठेका घेणार कोण?' ..कारण हा भाऊम्हणे सगळ्या जगाचा 'ठेका' घेतो, पण याच्या 'पराभवाचा ठेका' घेणार्‍याचं नाव काही लवकर पुढं येईनासं झालंय.
पूर्वीच्या काळी माण पट्टय़ात अंमल केवळ सदाशिव पोळ यांचाच.तात्या म्हणतील तीच दिशा ठरायची;परंतु पाच वर्षांपूर्वी जयकुमार गोरेंनी आमदारकीचं मैदान मारलं. पवारांच्या लोकसभा मतदारसंघातच 'राष्ट्रवादी'चा पराभव व्हावा, ही गोष्ट जिल्ह्यातल्या नेत्यांच्या मनाला लागली.त्यांनी गेल्या चार-साडेचार वर्षांत संधी मिळेल तेव्हा गोरेंवर शाब्दिक हल्ला चढवला.जिथं-जिथं शक्य होतं, तिथंगोरेंना नामोहरम करण्याचा प्रयत्न केला;परंतु हाय.. गोरेहीे भलतेच वस्ताद निघालेले.पवार काका-पुतण्यासह रामराजे अन्शशिकांत शिंदेंची कसलीही भीडभाड न ठेवता उलट त्यांनी त्यांच्यावरच आक्रमक प्रतिहल्ला केलेला. 
'मोगराळे अन् वर्धनगड' घाट चढून वर येणार्‍या नेत्यांचा बंदोबस्त त्यांच्याच गावात करण्याची खेळीही याच गोरेंनी लोकसभेला खेळलेली.फलटणमध्ये रणजितसिंहांना उचकवून बसविण्यात त्यांचा जसा मोठा हात, तसाच कोरेगावातील काँग्रेस मंडळींना भडकविण्यातही म्हणे त्यांचाच पुढाकार.लोकसभेला पालकमंत्र्यांच्या तालुक्यात येऊन 'आघाडी'च्या व्यासपीठावर थेट 'घड्याळ बंद पाडण्याची भाषा' वापरणारा हा नेता कदाचित जिल्ह्यात एकमेव ठरलेला.
तर असा हा उधळलेला वारू अडविण्यासाठी सदाशिवतात्या अन् अनिलभाऊ उत्सुक. गुलाबराव पोळही अत्यंत शांतपणे पै-पाव्हण्यांची 'लिंक' जोडत निघालेले.असं असलं तरी 'पायात पाय घालण्याची सवय' यंदाही 'राष्ट्रवादी'ला घातक ठरण्याचीे शक्यता. पक्षातले सर्व गट-तट एकत्र आले तरच गोरेंना सक्षम पर्याय निर्माण होऊ शकतो, हे माहीत असूनही आजपावेतो ही मंडळी काही गटबाजीच्या मानसिकतेतून बाहेर न आलेली.
असो. 'आपल्यासमोर एकही तगडा उमेदवार नाही!' या भ्रमात जयकुमार असले तरी त्यांच्याच घरातला एक भाऊ आजकाल ज्या पध्दतीनं वागतोय, बोलतोय, फिरतोय.. ते पाहून अनेकांना आगामी निवडणुकीतल्या 'भन्नाट गमती-जमती'ची चुणूक लागलेली.'माण-खटावचा आमदार मीच ठरविणार' अशी राणा भीमदेवी घोषणा करणारे शेखरभाऊ लोकसभेला राष्ट्रवादीसोबत राहिलेले.तीन-चार हजार कार्यकर्त्यांचा जत्था घेऊन जेव्हा ते राष्ट्रवादीच्या जाहीर सभेला मोठय़ा जोषात सामील झाले होते, तेव्हा व्यासपीठावर बसलेल्या अजित पवारांचेही डोळे क्षणभर चमकले होते.शेखरभाऊंना न्याहाळताना अजितदादांच्या नजरेत त्याक्षणी कोणते भाव होते, हे कुणाच्या नीट लक्षात आलं नाही; मात्र त्याचदिवशी तिकडं अकलूजमध्ये कुठंतरी प्रतापसिंह म्हणे आर्तपणे कळवळून सांगत होते, 'घराघरात भांडणं लावून आजपर्यंत बारामतीच्या पवारांनी केवळ आपली राजकीय पोळी भाजून घेतली!' ..आता अकलूजच्या वाड्यातली ती 'वेदनेची तीव्रता' न समजण्याइतपत जयकुमार नक्कीच भोळे नसावेत, म्हणूनच घरातला हा नाजूक गुंता ते नेहमीप्रमाणं किती चाणाक्षपणे सोडवितात, याकडेच 'माण-खटाव'मधल्या जनतेचं बारीक लक्ष!