शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

म्हणे... सरपंच व्हायचय मला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 17:01 IST

उंडाळे : सध्या कºहाड तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. सरपंच पदासाठी अर्ज भरण्यासही प्रारंभ झाला आहे. यामध्ये हणमंतवाडी ग्रामपंचायतीमध्ये सध्या सरपंचपद हे इतर मागासवगीय पुरूष यासाठी आरक्षित आहे. त्यामुळे सरपंच पदासाठी अनेकांनी कंबर कसलेली दिसून येतेक़ काहीजण जरतर गुडघ्याला बाशिंगच बांधून बसले आहेत.हणमंतवाडी येथील निवडणुकीचे वातावरण चांगलेच ...

ठळक मुद्देहणमंतवाडी येथील निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापलेअनेकांनी कंबर कसलीट जनतेतून निवडून येत असल्याने अनेकांना सरपंच पदाचे डोहाळेसदस्य पदासाठी लावली फिल्डींग

उंडाळे : सध्या कºहाड तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. सरपंच पदासाठी अर्ज भरण्यासही प्रारंभ झाला आहे. यामध्ये हणमंतवाडी ग्रामपंचायतीमध्ये सध्या सरपंचपद हे इतर मागासवगीय पुरूष यासाठी आरक्षित आहे. त्यामुळे सरपंच पदासाठी अनेकांनी कंबर कसलेली दिसून येतेक़ काहीजण जरतर गुडघ्याला बाशिंगच बांधून बसले आहेत.

हणमंतवाडी येथील निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापलेले दिसून येते. येथील लोकसंख्या सुमारे चारशेच्या घरात आहे. हणमंतवाडी, कुंभारवाडा हे वॉर्ड यामध्ये येतात. एकूण सात सदस्यांची ग्रामपंचायत आहे. येथील निवडणूक ही नेहमीच बिनविरोध होत असल्याने खेळीमेळीचे वातावरण असते. यंदा मात्र, चित्र वेगळेच पहायला मिळत आहे.

सरपंच पद हे थेट जनतेतून निवडून येत असल्याने अनेकांना सरपंच पदाचे डोहाळे लागल्याचे दिसून येतेय. यामध्ये सरपंच पदासाठी इच्छुक असणारे अर्जुन सुतार आणि दुसरे रत्नाप्पा कुंभार यांनी आपापले गट राखण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तर  तरूण नितीन मोरे हे सुद्धा इच्छुक असून यांनी सुद्धा सदस्य पदासाठी फिल्डींग लावली आहे. एकूणच या ग्रामपंचायतीमध्ये कमी लोकसंख्या असल्याने कोण कोणाच्या बाजूने कौल देणार हे मात्र येणारा काळच ठरवणार आहे.

मात्र, सरपंच पद हे थेट जनतेतून असल्याने प्रत्येकाने केलेल्या चांगल्या कामाची दखल घेऊनच सुज्ञ मतदार मतदान करणार आहेत. त्यामुळे मोदी सरकारने घेतलेल्या सरपंचपदाचा निर्णय ग्रामीण भागात कितपत यशस्वी होईल हे मात्र, उत्सुकतेचे ठरेल.