शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

रोमिओला ‘ती’ने शिकवला धडा!

By admin | Updated: August 9, 2016 23:54 IST

कऱ्हाडातील घटना : पोलिसांसमोरच मुलाच्या श्रीमुखात भडकावली

कऱ्हाड : फ्रेंडशीप करण्यासाठी एका अल्पवयीन मुलाने मुलीचा पाठलाग सुरू केला. संबंधित मुलीने नकार देऊनही त्याचा पाठलाग सुरूच होता. अखेर मुलीने चौकीनजीक उभ्या राहिलेल्या पोलिसांना या प्रकाराची माहिती देऊन पोलिसांसमोरच त्या मुलाच्या श्रीमुखात भडकावली. शहरातील चावडी चौकात मंगळवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, शहरानजीकच्या एका गावातील मुलगी मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे बसस्थानकात आली. तेथून ती चालत महाविद्यालयाकडे जात होती. त्यावेळी एका मुलाने तिचा पाठलाग सुरू केला. रस्त्यात काही अंतर गेल्यानंतर त्याने त्या मुलीला अडवले. त्याने तिला फ्रेंडशीप करणार का, असे विचारले. मात्र, त्याला नकार देऊन मुलगी पुढे गेली. मात्र, तरीही त्या मुलाने तिचा पाठलाग सुरूच ठेवला. मुलगा पाठीमागून येत असल्याने मुलगी घाबरली. ती लवकरात लवकर कॉलेजमध्ये पोहोचण्याच्या मन:स्थितीत होती. मात्र, मुलगा तिचा पिच्छा सोडत नव्हता. त्यामुळे घाबरलेली मुलगी अक्षरश: घामाने भिजली. त्यावेळी चावडी चौकात काही पोलिस कर्मचारी उभे असल्याचे मुलीला दिसले. धाडस करून ती त्याठिकाणी गेली. अचानक एक कॉलेजमधील मुलगी घाबरलेल्या स्थितीत समोर उभी राहिल्याचे पाहून ती संकटात असावी, हे पोलिसांच्या लक्षात आले. त्यांनी तिच्याकडे विचारणा केली. त्यावेळी तिने रडतच एक मुलगा माझा पाठलाग करून त्रास देत आहे, असे सांगितले. पोलिसांनी मुलाबाबत विचारणा केली असता मुलीने संबंधित मुलाकडे बोट दाखवले. पोलिसांनीही तातडीने संबंधित मुलाला ताब्यात घेतले. मुलीसमोर आणून त्याच्याकडे त्यांनी चौकशी सुरू केली. मात्र, त्याचवेळी संतापलेल्या मुलीने संबंधित मुलाच्या श्रीमुखात लगावली.घटना समोर येताच त्याठिकाणी गर्दी जमली. नागरिकांनी संबंधित मुलावर संताप व्यक्त केला. अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस कर्मचाऱ्यांनी संबंधित मुलगी व मुलाला शहर पोलिस ठाण्यात आणले. त्यांच्या पालकांना बोलावून घेण्यात आले. संबंधित मुलगा अल्पवयीन असल्याने पोलिसांनी त्याला समज देऊन नातेवाइकांच्या ताब्यात दिले. (प्रतिनिधी)