शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

प्रेयसीच्या घरासमोर तरुणाची आत्महत्या

By admin | Updated: April 10, 2016 00:11 IST

हडपसरमधील घटना : मोटारीत कोंडून पेटवून घेतले

पुणे : प्रेयसीचे लग्न झाल्यानंतरही तिचा पिच्छा पुरवणाऱ्या प्रियकराने तिच्या घरासमोरच स्वत:ला मोटारीमध्ये कोंडून पेटवून घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी हडपसर येथील ग्लायडींग सेंटरसमोर पहाटे साडेसहाच्या सुमारास घडली. अजित आत्माराम इंगळे (वय २६, रा. मंगळवार पेठ, ता. फलटण, जि. सातारा) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंगळे हा फलटणमध्ये इलेक्ट्रिकल ठेकेदार आहे. त्याचे नात्यातील एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. ही तरुणी हडपसर-सासवड रस्त्यावरच्या ग्लायडींग सेंटरसमोर राहण्यास आहे. त्यांच्या प्रेमसंबंधाला मुलीच्या घरच्यांचा विरोध होता. त्यांनी इंगळेचा लग्नाचा प्रस्ताव नाकारत तरुणीचे दुसऱ्या मुलासोबत लग्न लावून दिले. परंतु लग्नानंतरही त्याने तिचा पिच्छा सोडला नाही. ‘माझ्याशी लग्न कर नाहीतर मी तुझ्या घरासमोर आत्महत्या करेन’, अशी धमकी तो देत होता. गुढी पाडव्याच्या सणासाठी तरुणी माहेरी आली होती. याची माहिती मिळताच तो फलटणवरुन मित्राची मोटार घेऊन पुण्यामध्ये आला. तरुणीला फोन करुन त्याने ‘भेटायला ये, अन्यथा तुझ्या घरासमोर आत्महत्या करीन’ अशी धमकी दिली. तिच्या घरासमोर आल्यानंतर त्याने मोटारीमध्येच स्वत:ला पेटवून घेतले. गाडीमधून मोठ्या प्रमाणावर धूर येऊ लागल्यावर नागरिकांनी गाडीच्या काचा फोडून आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाऱ्यामुळे आग भडकली. अग्निशामक दलाच्या जवानांनी आग विझवल्यावर इंगळेचा जळालेला मृतदेह मिळाला.