शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

पथक आले, पळा.. पळा !

By admin | Updated: February 16, 2017 23:12 IST

निवडणुकीवर वॉच : माण, खंडाळा तालुक्यांत मद्याच्या बाटल्या पकडल्या

सातारा : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीवर जिल्हा प्रशासन ‘वॉच’ ठेवून आहे. जिल्ह्यात जागोजागी धाडी टाकून भरारी पथकाने कारवाया केल्या. माण व खंडाळा या दोन तालुक्यांमध्ये मद्याच्या बाटल्या पकडण्यात आल्या. त्यामुळे ‘भरारी पथक आले पळा...पळा,’ असे म्हणण्याची वेळ काही कार्यकर्त्यांवर आली आहे. जिल्ह्यातील ६४ जिल्हा परिषद गट व १२८ पंचायत समिती गणांसाठी प्रचाराचा धडाका सुरू झाला आहे. या निवडणुकीमुळे अनेकांना सुगीचे दिवस आले आहेत. दोन वेळचे जेवण, तोंड ओले करण्याची फुक्कट संधी आणि एक हरी पत्ती रोज मिळत असल्याने प्रचारात सहभागी होऊन रात्रीचा दिवस करणाऱ्या कार्यकर्त्यांची भलतीच चांदी झाली आहे. कार्यकर्त्यांना सोबत ठेवायचे म्हटल्यावर अनेक उमेदवारांनी त्यांची ‘इत्थंभूत’ सोय केल्याचे जागो जागी पाहायला मिळते. निवडणूक हंगामात हात धुवून घेण्यासाठी अनेकांची लगबग सुरू आहे. घरात कमी पण नेत्यासोबत जास्त अशी अनेकांची अवस्था आहे. त्यातच यात्रांचा हंगाम सुरू असल्याने अनेकजण मिळणाऱ्या मद्याच्या बाटल्या घरी स्टॉक करून ठेवू लागले आहेत. या परिस्थितीचा अंदाज घेत जिल्हा प्रशासनाने ३७ भरारी पथके स्थापन केली आहेत. ३७ ठिकाणी चेकनाके तयार करण्यात आले आहेत. तसेच जिथे नेत्यांच्या सभा होतात, अथवा कोपरा सभा होतात, तिथे व्हिडिओ शूटिंग केले जात आहे. उमेदवारांची कार्यालयेही तपासली जात आहेत. उमेदवारांच्या खर्चाचा तपशीलही अचानकपणे घेतला जात आहे. प्रत्येक टीममध्ये ४ ते ५ लोक कार्यरत आहेत. अ‍ॅक्साईज, सेल्स टॅक्स व पोलिस अशा विविध विभागांच्या कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे. भरारी पथकांनी जिल्ह्यात जागोजागी धाडी टाकायला सुरुवात केली आहे. माण तालुक्यातील एका हॉटेलवर कारवाई करून अवैध मद्याच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. खंडाळा तालुक्यात दोन खासगी व्यक्ती मद्याच्या बाटल्या घेऊन जात असताना आढळल्याने त्यांना पकडण्यात आले. माण तालुक्यातील शेणवडी फाटा येथे चारचाकी वाहनातून मद्याच्या बाटल्या घेऊन जाताना एका व्यक्तीला पकडण्यात आले. (प्रतिनिधी)