शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक संघाचे ‘पुस्तक’ बरबटलेले: फडतरे

By admin | Updated: June 19, 2015 00:21 IST

चारजणांची उमेदवारी मागे.

सातारा : ‘संघाची बँकेच्या कारकिर्दीची पुस्तके आॅडिटमधील ताशेरे, जमेल तेथे दरोडे आणि लुटमारांनी भरलेली आहेत,’ असा आरोप शिक्षक समितीचे जिल्हा सरचिटणीस विठ्ठल फडतरे यांनी केला.रहिमतपूर, ता. कोरेगाव येथे प्रगती पॅनेलच्या प्रचारार्थ आयोजित बैठकीमध्ये ते बोलत होते. समितीचे राज्य सरचिटणीस उदय शिंदे, जिल्हाध्यक्ष शंकर देवरे, शिक्षक बँकेचे अध्यक्ष विठ्ठल माने, उपाध्यक्ष विजय जाधव, प्रदीप कदम, विनोद मोरे, सुरेश पवार, रमेश माने, संतोष घाडगे, उमेदवार संतोष मांढरे, रणजित शिंदे यांची प्रमुख उपस्थित होती.फडतरे म्हणाले, ‘गेल्या पाच वर्षांत समितीच्या संचालक मंडळावर शासकीय लेखा परीक्षणात एकही ताशेरा ओढण्यात आला नाही. रिझर्व्ह बँकेनेही बँकेच्या कामकाजाचे कौतुक केले आहे. पुस्तके उपाध्यक्ष असलेल्या महाराष्ट्र सॅलरी ओनर्स असोसिएशनचे बँकेच्या कामकाजास एकदा नव्हे, दोनदा पुरस्कार देऊन गौरविले आहे, असे असताना घोटाळ्यांचा आरोप करणे हास्यास्पद आहे.विठ्ठल माने, उदय शिंदे यांनी बँकेची नफास्थिती, व्यवस्थापन खर्च, कायम ठेवीवरील व्याज याबाबी सभासदांसमोर मांडल्या.प्रदीप कदम यांनी प्रास्ताविक केले. बी. एस. साबळे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)चारजणांची उमेदवारी मागे...जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीच्या प्रगती पॅनेलला पाठिंबा देत चार उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेऊन शिक्षक बँकेच्या प्रगतिशील कारभाराला समर्थन देण्याचा निर्णय पत्रकाद्वारे जाहीर केला आहे. त्यामध्ये परळी मतदार संघामधून महेश वंजारी, महिला राखीव गटातून संध्या बोबडे, इतर मागास प्रवर्गातून सचिनकुमार गाढवे व प्रदीप नीळकंठ यांचा समावेश आहे. त्यांनी समर्थन देत असल्याचे पत्रकाद्वारे कळवून समितीच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतला आहे, अशी माहिती शिक्षक समितीचे जिल्हा सरचिटणीस विठ्ठल फडतरे यांनी दिली.