शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

निधीला ‘डांबर’... रस्त्यावर ‘पाणी’

By admin | Updated: February 13, 2015 22:59 IST

पाटबंधारे खात्याचे दुर्लक्ष : वाई-पसरणी रस्त्याचे रुंदीकरण, डांबरीकरण रखडले

वाई : वाई-पसरणी रस्त्याचे रुंदीकरण, नवीन ९० लाखांच्या निधीचे डांबरीकरण, वाई पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे व चाल ढकलीमुळे होणाऱ्या पाण्याच्या गळतीमुळे पुन्हा खराब होण्याची परिस्थिती निर्माण झाली असून, पसरणी ग्रामस्थांकडून व प्रवाशांकडून पाटबंधारे विभागाच्या या कारभाराबद्दल प्रचंड संताप व्यक्त होत आहे.पसरणी ग्रामस्थांच्या प्रयत्नामुळे वाई-पसरणी रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरणाचे काम सुरू आहे. या पूर्वीही अनेकवेळा या रस्त्यासाठी लाखोंचा निधी खर्च झाला आहे. यावेळी ९० लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे. रस्त्याचे काम सुरू असून, नाल्याची कामे बाकी आहेत. वाई-पसरणी रोडवर धोम धरणाच्या कालव्याचे शेती पाण्यासाठी दोन ठिकाणी पाट आहेत. हे रस्त्याच्या खालून जातात. त्याचे बांधकाम अतिशय जुने झाले असून, कालव्यातून पाणी सुटल्यानंतर त्यातून पाण्याची मोठी गळती होते. त्यामुळे या रस्त्याचे काम होऊन टिकत नाही. डांबर निघून जाऊन सतत मोठ-मोठे खड्डे पडतात. यावेळी रस्त्याचे काम चालू होण्यापूर्वी पसरणी येथील माजी सरपंच व कार्यकर्त्यांनी वाई-सातारा पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून व पाणी गळती ठिकाणी नेहून परिस्थिती दाखविली होती. याबाबत अनेकवेळा निवेदनेही दिली गेली आहेत. यावर पाटबंधारे विभागाकडून त्या पाण्याच्या धाऱ्यावर थोडेसे काम केले आहे. कालव्याचे पाणी सुटल्यानंतर पुन्हा त्यातून पाणी गळती होऊन रस्ता खराब होत आहे. नवीन डांबरीकरणही पाण्यात जाण्याची धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. पाटबंधारे विभागाच्या या कामकाजाबाबत ग्रामस्थ व प्रवाशांकडून संताप व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)वाई पसरणी रस्त्यासाठी यावेळी ९० लाखांचा निधी उपलब्ध झाला असून, कालव्याच्या शेतीपाण्याच्या गळतीमुळे यापूर्वीही गेली अनेक वर्षे रस्ता खराब होत आहे. संबंधित वाईचे पाटबंधारे विभागाचे अधिकारी चंदकांत सणस तसेच सातारा विभागाचे बी. बी. मोरे यांना प्रत्यक्ष ठिकाणी नेहून परिस्थिती दाखवली आहे. परंतु त्यांनी केवळ किरकोळ जुन्या कामाला डागडुजी केल्याने पुन्हा गळती सुरू झाली आहे. त्यामुळे रस्त्याचे काम खराब होणार आहे.- राजेंद्र शिर्के, माजी सरपंच, पसरणीधोम धरणाच्या कालव्यातून येणाऱ्या शेतीसाठी पाण्याच्या दाऱ्याची कामे कालवे निर्मितीच्यावेळी ४० वर्षांपूर्वी झाली आहेत. त्याची नवीनच बांधकामे होण्याची गरज असून, यासाठी गळतीमुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास होत आहे व रस्ता वारंवार खराब होत आहे.- वामनराव खरात, शेतकरी