शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील चार तालुक्यांत टँकरने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:49 IST

सातारा : जिल्ह्यात सलग दोन वर्षे दमदार पाऊस झाला. तसेच जलसंधारणाच्या कामामुळे पाणीसाठे टिकून राहत असल्याने यंदा मार्च महिन्याच्या ...

सातारा : जिल्ह्यात सलग दोन वर्षे दमदार पाऊस झाला. तसेच जलसंधारणाच्या कामामुळे पाणीसाठे टिकून राहत असल्याने यंदा मार्च महिन्याच्या अखेरीस जिल्ह्यात टँकर सुरू झाला. सध्या जिल्ह्यातील ४ तालुक्यांत टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. यावर ६ गावे आणि १० वाड्यांतील ७ हजार नागरिक अवलंबून आहेत. तसेच पशुधनालाही टँकरचाच आधार आहे.

जिल्ह्यात तीन-चार वर्षांतून दुष्काळ पडतो. त्यातच पाऊस होऊनही माण, खटावसारख्या तालुक्यांत डिसेंबर, जानेवारी महिना उजाडताच टँकर सुरू करावे लागायचे. पण, गेल्या काही वर्षांत हे चित्र बदललंय. याला कारण म्हणजे जलसंधारणाची झालेली कामे. त्याचबरोबर वॉटर कप स्पर्धेमुळे तर पाणी साठवण्याचं तुफान आलेलं. माण, खटाव आणि कोरेगाव या तालुक्यांत जलसंधारणाची मोठी कामे झाली आहेत. त्यामुळे पावसाचं पडलेलं पाणी अडून राहिलं व त्याचा फायदाही टंचाई निवारणासाठी झाला आहे.

जिल्ह्यात दोन वर्षांपासून दमदार पाऊस होत आहे. २०१९ आणि २०२० या दोन वर्षांत सरासरीहून अधिक पाऊस झाला. त्यामुळे यंदा उन्हाळ्यात टंचाईची स्थिती एकदम कमी राहणार असल्याचे समोर येऊ लागले आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाने संभाव्य टंचाई आराखडा तयार केला आहे. ऐन उन्हाळ्यात जिल्ह्यातील १६९ गावांना आणि २२६ वाड्यांत टंचाई भासू शकते. पण, यामधील १३८ गावांनाच टंचाईचा सामना करावा लागण्याचा अंदाज आहे. यासाठी ४६ टँकर लागू शकतात. त्यासाठी जवळपास अडीच कोटींचा खर्च अपेक्षित आहे. मात्र, उन्हाळा संपत आलातरी अजूनही मोठ्या प्रमाणात टँकर सुरू नाहीत.

गेल्या वर्षी मार्च महिन्याच्या मध्यावर जिल्ह्यातील पहिला टँकर खटाव तालुक्यात सुरू झाला होता. त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर तालुक्यांत टंचाई निवारणासाठी उपाययोजना राबविण्यात आल्या. मात्र, यावर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत टँकर उशिरा सुरू झाला आहे. वाई तालुक्यातील २ गावे आणि ३ वाड्यांसाठी प्रथम टँकर सुरू झाला. आतातर ४ जिल्ह्यांत टँकर सुरू झाला आहे. लवकरच आणखी काही गावांत टंचाई भासणार आहे.

चौकट :

वाई, माण, पाटण अन् कऱ्हाड तालुक्यांत टँकर...

वाई तालुक्यातील ३ गावे आणि ३ वाड्यांसाठी २ टँकर सुरू आहेत. यावर २९३१ नागरिक आणि १००५ पशुधन अवलंबून आहे. मांढरदेव परिसरातील ही गावे आहेत. माण तालुक्यात १ गाव आणि ५ वाड्या तहानलेल्या आहेत. यासाठी १ टँकर मंजूर आहे. वारुगड अंतर्गत पाणीपुरवठा सुरू आहे. पाटण तालुक्यातील आंब्रुळकरवाडी (भोसगाव), चव्हाणवाडी, नाणेगाव येथे टँकर सुरू आहेत. येथे एका टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. त्याचबरोबर कऱ्हाड तालुक्यात वानरवाडी आणि बामनवाडीसाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. शासकीय २ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. १९४९ नागरिक आणि ९६८ पशुधन टँकरवर अवलंबून आहे.

.........................................................................