शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

पाण्यासह टाकी कोसळली

By admin | Updated: June 14, 2016 00:22 IST

तांबवेत दुर्घटना : दोन कार, पाच दुचाकींचे नुकसान; जीवितहानी टळली

तांबवे : तांबवे गावाला चोवीस तास पाणीपुरवठा करण्यासाठी तीन वर्षांपूर्वी बांधलेली पाण्याची टाकी सोमवारी पहाटे साडेतीन वाजता दीड लाख लिटर पाण्यासह अचानक कोसळली. या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही. मात्र, दोन कार व पाच दुचाकींचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे काम केल्याने ही पाण्याची टाकी जमीनदोस्त झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.दरम्यान, ठेकेदार संभाजी पाटील व नरेंद्र जानुगडे घटनास्थळी आल्यानंतर तणाव निर्माण झाला होता. ग्रामस्थांनी त्यांना घेराव घालत त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. त्यामुळे त्या दोघांनी लगेच तेथून काढता पाय घेतला.तांबवे गावची लोकसंख्या ५ हजार ८८१ आहे. तीन वर्षांपूर्वी येथे लोकसहभागातून चोवीस तास पाणी योजनेचे काम करण्यात आले. हे काम मलकापूरच्या शिवरत्न कन्स्ट्रक्शनला देण्यात आले होते. टाकीचे बांधकाम पूर्ण होऊन ४ मे २०१३ रोजी टाकीचे उद्घाटन झाले. १ लाख ३० हजार लिटर पाणी साठवण क्षमता असलेली ही टाकी रघुनाथ मंदिराजवळ कोयना नदीकाठी बांधण्यात आली होती. सोमवारी पहाटे अचानकच ही टाकी कोसळली. पाण्याची टाकी कोसळताना मोठा आवाज झाला. परिसरातील जमीन हादरली. भूकंप झाल्याच्या शक्यतेने ग्रामस्थ जीव वाचविण्यासाठी घराबाहेर आले. मात्र, पाण्याची टाकी कोसळत असल्याचे दिसताच ते जिवाच्या आकांताने सुरक्षित ठिकाणी पळाले.टाकीजवळ रस्त्यावर पार्क केलेली अनिल इनामदार व पंडित पाटील यांच्या कार पाण्याने वाहून गेल्या. दोन्ही कार टाकीपासून १०० मीटर लांब गेल्या आहेत. नदीकाठाला पाणवठ्यावर लावलेल्या झाडामुळे गाड्या थांबल्या, अन्यथा त्या गाड्या नदीत गेल्या असत्या. तसेच किशोर पाटील, भाऊसाहेब पाटील, भगवान पाटील, विकास पाटील व सुनील पाटील यांच्या टाकीशेजारी लावलेल्या दुचाकींचेही मोठे नुकसान झाले. (वार्ताहर)