सातारा : राजवाडा येथे नव्याने बांधण्यात आलेल्या प्रतापसिंह भाजी मंडई व फ्रूट मार्केट आजपासून सुरू झाले. गेले कित्येक वर्ष विक्रेत्यांनी पाहिलेली प्रतिक्षा आज सत्कारर्णी लागली. अत्याधुनिक अशा नव्या जागेत विक्रेत्यांना जागा उपलब्ध झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणीत झाला होता.वर्षानुवर्ष उन्हातान्हात बसून सातारकरांना ताज्या भाज्या देणारे विक्रेते दुर्लक्षीत झाले होते. त्यामुळे पालिकेने या विक्रेत्यांची दखल घेऊन अत्याधुनिक अशी प्रतापसिंह भाजी मंडई उभारली. या नव्या मंडईमध्ये एकूण १०२ कट्टे बांधण्यात आले. काही दिवसांपूर्वी लीलाव पद्धतीने ८५ कट्टे विक्रेत्यांना देण्यात आले. मात्र अद्याप काहीजणांना कट्टे मिळाले नाहीत. त्यामुळे काही विक्रेत्यांमध्ये नाराजी आहे. दरम्यान मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी मंगळवारी या नव्या मंडईमध्ये विक्रेत्यांना बसण्याच्या सुचना दिल्या. त्यानंतर विक्रेत्यांनी भाजी विकण्यास सुरूवात केली. मुभलक जागा, हवेशीर ठिकाण, स्वच्छता आणि उन, वारा, पाऊस यापासून सुरक्षा मिळाल्याने विक्रेत्यांमधील उत्साह बघण्याजोगा होता. मोठ-मोठ्याने आवाज देत गिऱ्हाईकांना आकर्षीत करण्यासाठी विक्रेत्यांची अक्षरश: चढाओढ सुरू होती. मंडईच्या प्रवेशद्वाराजवळ रांगोळी काढून गिऱ्हाईकांचे स्वागत करण्यात आले. मंडईच्या एका कोपऱ्यामध्ये सत्यनारायणची पुजा मांडण्यात आली. मंडईत येणाऱ्या प्रत्येका प्रसाद दिला जात होता.काही विक्रेत्यांनी कट्यावर अगरबत्ती लावल्यामुळे वातावरण प्रसन्न झाले होते. (प्रतिनिधी)काही विक्रेते नाराज मंडईमध्ये काही विक्रेत्यांना अद्याप जागा मिळाली नाही. त्यामुळे विक्रेत्यांमध्ये नाराजी आहे. ज्या लोकांनी नातेवाईकांच्या नावावर कट्टे घेतले आहेत. तसेच ज्यांकडे डबल कट्टे आहेत, अशा लोकांचे कट्टे काढून घेऊन इतरांना द्यावेत, अशी चर्चा विक्रेत्यांमधून सुरू होती.
घ्या कांदाऽ बटाटाऽऽ आवाजाने दुमदुमली मंडई
By admin | Updated: December 2, 2014 23:29 IST