शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दिशाभूल करणाऱ्यांवर कारवाई करा

By admin | Updated: September 1, 2014 23:06 IST

वजराई धबधबा : पर्यटकांकडून पुन्हा विनापावत्या शुल्कवसुली केल्याची तक्रार

सातारा : भारतातील सर्वांत उंच वजराई धबधबा सातारा तालुक्यातील भांबवली गावाच्या हद्दीत असताना कासला येणाऱ्या पर्यटकांकडून विनापावत्या शुल्क घेण्यास पुन्हा एकदा प्रारंभ झाला असल्याची तक्रार भांबवली ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. दिशाभूल करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात भांबवलीच्या सरपंच नवाबाई मोरे आणि ग्रामस्थ मंडळ यांनी म्हटले आहे की, गेल्या वर्षी शुल्कवसुली बंद करण्याचे आदेश कास येथील संबंधितांना देण्यात आले असूनही पुन्हा एकदा ‘कास-वजराई धबधबा’ असे फलक लावून विनापावत्या शुल्कवसुली सुरू झाली आहे. हा धबधबा भांबवली गावच्या हद्दीत असून, ‘विकिपीडिया’नेही त्याची दखल घेतली आहे. माध्यमांमुळे हा धबधबा प्रसिद्ध झाल्यानंतर गेल्या वर्षी त्याचा गैरफायदा घेण्यासाठी ‘कास-वजराई धबधबा’ असे फलक लावून कासला आलेल्या पर्यटकांना धबधब्याचे वरचे टोक दाखवून दिशाभूल आणि फसवणूक केली जात होती. पावतीपुस्तकाद्वारे पैसे गोळा केले जात होते.भांबवली वन हक्क समितीने या बेकायदा गोष्टी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. कास गाव जावली तालुक्यात असल्याने जिल्हाधिकारी आणि प्रांताधिकाऱ्यांनी जावलीच्या तहसीलदारांना कारवाईचे आदेश दिले. तहसीलदारांनी मेढा पोलिसांना आदेश देऊन कासमधील संबंधितांना त्यांच्यासमोर हजर करण्यास सांगितले. तहसीलदारांनी कास ग्रामस्थांना बेकायदा वसुली बंद करण्याचे तसेच ‘कास-वजराई धबधबा’ हा अनधिकृत फलक काढून टाकण्याचे आदेश दिले. असे अनधिकृत कृत्य केल्यास कारावास व पुन्हा असे कृत्य केल्यास कारावास व दंडठोठावण्यात येईल, अशी तंबी दिली. ग्रामस्थांनी अजाणतेपणी झालेल्या चुकीची माफी मागितली आणि आदेशाचे पालन करण्याचे मान्य केले. तथापि, यंदाच्या हंगामातही ‘कास-वजराई धबधबा’ असा अनधिकृत फलक कास मंदिराजवळ लावून काही ग्रामस्थ पर्यटकांची फसवणूक करीत आहेत आणि विनापावत्या पैसे लुबाडले जात आहेत.’ (प्रतिनिधी)कायमची बंदी घालाजिल्हाधिकारी आणि तहसीलदारांच्या अदेशाची पायमल्ली झालेली असल्यानेमुळे कारवाईची गरज आहे. पर्यटकांची दिशाभूल, फसवणूक आणि लुबाडणुकीबद्दल कायदा मोडणाऱ्यांवर कारवाई करावी. संबंधितांवर भारतीय दंडविधानाच्या कलम ४१५ आणि ४२० अंतर्गत कारवाई करावी. तसेच वन विभागाच्या नोंदीप्रमाणे वजराई धबधबा भांबवली गावच्या हद्दीत येत असल्याने ‘कास-वजराई धबधबा’ हे नाव वापरण्यास कायमची बंदी घालावी, अशा मागण्या ग्रामस्थ मंडळाने केल्या आहेत.