शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मातब्बरांकडून तलवारी म्यान

By admin | Updated: February 13, 2017 22:47 IST

कोरेगाव तालुक्यात अनपेक्षित घडामोडी : ६७ उमेदवारांनी घेतली माघार

कोरेगाव : कोरेगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पाच गटांसाठी ४९ उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जांपैकी २७ जणांनी माघार घेतली. त्यामुळे आता २२ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. पंचायत समितीच्या दहा गणांसाठी ७६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ४० जणांनी माघार घेतल्याने आता ३६ जण आपले नशीब आजमावत आहेत. गट व गणासाठी होणाऱ्या संघर्षपूर्ण लढतीकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.नाट्यमय घडामोडीनंतर काँग्रेसचे किन्हई पंचायत समिती गणातील उमेदवार तुकाराम वाघ यांनी अनपेक्षितरीत्या माघार घेतली, त्यानंतर काँग्रेसने लागोलाग अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात असलेल्या अ‍ॅड. अमोल राशीनकर यांचा पक्ष प्रवेश घडवत त्यांची उमेदवारी पुरस्कृत केली आहे. एकंदरीत तालुक्यात काही ठिकाणी तिरंगी तर काही ठिकाणी चौरंगी लढती होणार असल्याचे स्पष्ट झाले. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी सोमवारी (दि. १३) सकाळी ११ ते दुपारी ३ ही वेळ ठेवली होती. त्यामुळे सकाळपासून तहसीलदार कार्यालय आवारात गर्दी होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापासून विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी व पदाधिकाऱ्यांनी नाराजांची समजूत काढत त्यांना उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी राजी केले होते, त्यामुळे कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी कार्यकर्त्यांची फौज या परिसरात तैनात होती. राजकीयदृष्ट्या धगधगत्या पिंपोडे बुद्रुक गटात सर्वाधिक अर्ज दाखल झाले होते. तेथे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस होती. मतदारसंघ पुनर्रचनेनुसार हा गट फलटण विधानसभा मतदार संघात मोडत असल्याने तेथील निर्णय फलटणमधून होत होते. सकाळी या गटातून विद्यमान सदस्य सतीश धुमाळ, राहुल कदम, लालासाहेब शिंदे, सुधीर धुमाळ, शहाजी भोईटे, संभाजी शिंदे, आनंद भोईटे यांनी माघार घेतली. या गटात आता पंचरंगी लढत होणार आहे. वाठार स्टेशन जिल्हा परिषद गटातून ७ जणांनी माघार घेतल्याने आता तिरंगी लढत होत आहे. सातारारोड गटातून २, ल्हासुर्णे गटातून ६ तर वाठार किरोली गटातून ४ अर्ज माघारी घेण्यात आले.पंचायत समिती गणांमध्ये सर्वाधिक अर्ज पिंपोडे बुद्रुक गणात दाखल झाले होते. तेथे ८ जणांनी माघार घेतली असून, तेथे चौघेजण निवडणूक रिंगणात राहिले आहेत. देऊर गणामध्ये ३, वाठार स्टेशन गणामध्ये ४, किन्हई गणामध्ये ६, सातारारोड गणामध्ये ३, कुमठे गणामध्ये १, ल्हासुर्णे गणामध्ये २, एकंबे गणामध्ये ५, साप गणामध्ये ३ तर वाठार किरोली गणामध्ये ५जणांनी माघार घेतली. एकंदरीतकाही गणांमध्ये दुरंगी, काही ठिकाणी तिरंगी व चौरंगी लढती होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. (प्रतिनिधी)