शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

महिलांच्या आरोग्यासाठी शाश्वत आणि कृतिशील उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:44 IST

इंडिया पोस्ट हे जगातील सर्वात मोठे टपाल नेटवर्क आहे, जे देशभरात विशेषत: ग्रामीण भारतात प्रत्येकापर्यंत जोडलं गेलंय. महिलांच्या मासिक ...

इंडिया पोस्ट हे जगातील सर्वात मोठे टपाल नेटवर्क आहे, जे देशभरात विशेषत: ग्रामीण भारतात प्रत्येकापर्यंत जोडलं गेलंय. महिलांच्या मासिक पाळीत समाजाला सामावून घ्यायचं असेल तर पोस्ट कार्यालयांशिवाय पर्याय नाही. महिलांच्या आरोग्यासाठी शासकीय पातळीवर घेतलेल्या या पावलाला सातारकर साथ देतील, याची खात्री आहे.

- अपराजिता म्रिधा, प्रवर अधीक्षिका, सातारा डाक विभाग

प्रगती जाधव-पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : सातारा डाक विभागाने महिलांच्या सुरक्षित आरोग्यासाठी पूरक असे सॅनिटरी नॅपकीन ग्राहकांसाठी १ सप्टेंबरपासून डाक कार्यालयात उपलब्ध करून दिले आहे. महिलांच्या आरोग्यासाठी आणि त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कृतिशील उपक्रम राबविणाऱ्या सातारा डाक विभागाच्या प्रवर अधीक्षिका अपराजिता म्रिधा यांच्याशी साधलेला संवाद...

प्रश्न : पोस्टात नॅपकीन विक्री ही संकल्पना डोक्यात कशी आली?

उत्तर : सातारा जिल्ह्यात डाक कार्यालयांच्या दौऱ्यावेळी स्थानिक महिलांच्या आरोग्याविषयी विचार यायचे. जिथे स्वच्छ आंघोळीची सोय नाही, तिथे मासिक पाळीविषयी जागृतीचा विषयच खूप लांब आहे. हे ओळखून दिल्लीच्या संस्थांशी बोलून हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला.

प्रश्न : मासिक पाळीचं गांभीर्य समाजात आहे असं वाटतं?

उत्तर : मासिक पाळी हा अजूनही महिलांचाच विषय वाटतो. पाळी काळात मुलींची शाळेत गैरसोय होत असल्याने त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहातून बाजूला पडावे लागणे हे एकविसाव्या शतकातही आढळणे खेदाचे आहे. सामान्यांपासून ही चळवळ सुरू करण्यासाठी पोस्टातही सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

प्रश्न : ग्रामीण भागातील महिलांना नॅपकीन खरेदीसाठी पैसे मिळणार का?

उत्तर : महिलांमध्ये योनीमार्गाचा संसर्ग ही मोठी समस्या आहे. याचे मूळ कारण मासिक पाळीतील अस्वच्छता हेच आहे. ग्रामीण भागातील महिलांना नॅपकीन खरेदी करणं नाही जमलं तर स्वयंसेवी संस्थांना हाताशी घेऊन काही प्रायोजक बघून आम्ही हे महिलांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करू.

३६ टक्के महिलाच वापरतात नॅपकीन

राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षण २०१५-१६नुसार भारतात सुमारे ३३६ दशलक्ष मासिक पाळीधारक स्त्रियांपैकी फक्त ३६ टक्के स्त्रिया सॅनिटरी नॅपकीनचा वापरतात. उर्वरित महिला घरगुती पर्यायांवर अवलंबून राहत असल्याने त्यांच्यात आरोग्य समस्या वाढतात. समाजाचा घटक म्हणून ही संवेदनशिलता दाखवणं आवश्यक असल्याचं अपराजिता मानतात.

याठिकाणी सुरू होणार उपक्रम

महिलांच्या स्वच्छतेच्या बाजूने प्रभावी भूमिका घेताना हा प्रकल्प सातारा प्रधान डाकघर, कऱ्हाड प्रधान डाकघर, वडूज, फलटण, पाचगणी, कोरेगाव, मेढा, पाटण, ढेबेवाडी येथे सुरू करण्यात येणार आहे.