शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

नगरपंचायत इमारत बांधकामास स्थगिती

By admin | Updated: March 26, 2017 00:04 IST

धर्मादाय आयुक्तांचा आदेश : मलकापुरात काहीकाळ तणावाचे वातावरण; गुरव समाजातील महिलांचा बांधकामाच्या जागेवर ठिय्या

मलकापूर : येथील नगरपंचायतीने सुरू केलेल्या प्रशासकीय इमारत बांधकामास देवस्थान ट्रस्टच्या ट्रस्टींनी धर्मादाय आयुक्तांच्या आदेशाने स्थगिती आणली आहे. योग्य निर्णय होईपर्यंत हे बांधकाम जैसे थे ठेवण्याचा आदेश धमार्दाय आयुक्तांनी दिला आहे. हा आदेश नगरपंचायत प्रशासन व पोलिसांना सादर करून नगरपंचायत इमारत बांधकाम तत्काळ थांबवण्यात आले. देवस्थान ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांसह गुरव समाजाच्या महिला या जागेत आल्यावर तणावाचे वातावरण झाले.नगरपंचायत निर्मितीनंतर नगरपंचायत प्रशासनाने जागा मंजुरीनुसार प्रशासकीय इमारत व अग्निशामक युनिटसाठी ताब्यात घेण्याचे सोपस्कार केले. जमीन ताब्यात घेण्यासाठी नगरपंचायत प्रशासनाने महसूल विभागाकडे व जिल्हाधिकारी पातळीवर पूर्तता करत त्यांच्या आदेशानुसार ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यावर ट्रस्टचे कूळ म्हणून सागर श्रीरंग शिंदे यांनी उच्च न्यायालयात नगरपंचायत प्रशासनाला आव्हान दिले होते. या सर्व पातळीवर पाच वर्षांपासून सुरू असलेल्या दाव्याचा उच्च न्यायालयात प्रशासनाच्या बाजूने निकाल लागल्यावर नगरपंचायत प्रशासनाने १८ मार्चला जमीन ताब्यात घेऊन संरक्षक भिंतीच्या बांधकामास सुरुवात केली. त्यादिवशीही सागर शिंदे यांच्यासह काहीजणांनी बांधकाम थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. तसेच बांधकाम सुरू केले.शनिवारी संरक्षक भिंतीचे बांधकाम सुरू होते. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास मारुती व लक्ष्मीदेवी देवस्थानचे पदाधिकारी अरविंद गुरव, अशोक गुरव, मोहन गुरव, शिवाजी गुरव व कूळ सागर शिंदे यांच्यासह महिलांनी संबंधित ठेकेदारास बांधकाम थांबवण्यास सांगितले. त्यावेळी काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. (प्रतिनिधी)कामगारांनी गाशा गुंडाळलादेवस्थान ट्रस्टच्या ट्रस्टींनी धर्मादाय आयुक्तांचा स्थगिती आदेश दाखवताच कंत्राटदाराने तातडीने काम थांबवण्याच्या सूचना कामगारांना दिल्या. सूचना मिळताच कामगारांनीही हातपाय धुऊन साहित्यासह आपला गाशा गुंडाळला. सत्तेचा वापर करत नगरपंचायत प्रशासनाने मनमानी कारभार सुरू केला आहे. ही जमीन आमच्या ट्रस्टच्या मालकीची आहे. या जागेवर काहीही करताना ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांना कसलीही नोटीस दिलेली नाही. किंवा विश्वासातही घेतले नाही. आम्ही ट्रस्टच्या वतीने धर्मादाय आयुक्त न्यायालयाचा स्थगिती आदेश आणला आहे. ही जमीन गुरवकीची आहे, ती आमच्या गुरव समाजालाच मिळाली पाहिजे, ही आमची मागणी आहे. - अरविंद गुरव, देवस्थान ट्रस्टचे ट्रस्टी