सासवड : पुरंदर तालुक्यात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून अनियमित वीजपुरवठा होत आहे. त्यामुळे पाणी असूनही पिके जळू लागली असल्याने शेतकरीवर्ग अडचणीत सापडला आहे.
विद्युतपुरवठा सुरळीत व योग्य दाबाने करावा, तालुक्यातील भारनियमन कमी करावे, तालुक्यातील मंजूर उपकेंद्रे त्वरित सुरु करावीत, योग्य क्षमतेची रोहित्न (डी. पी.) स्थानिक अहवालानुसार व मागणीनुसार बसवण्यात याव्यात, यांसारख्या मागण्यांचे निवेदन पुरंदर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने सासवड येथील विद्युत वितरण कंपनीच्या अधिका:यांना देण्यात आले.
विद्युतपुरवठय़ात सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही या वेळी या निवेदनाद्वारे देण्यात आला. याप्रसंगी युवानेते संजय जगताप, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप पोमण, जिल्हा सरचिटणीस नंदकुमार जगताप, शेतकरी अशोकराव बोरकर, बाळासाहेब काळाणो, नवनाथ बोरावके, नवनाथ धोत्ने यांसह तालुक्यातील विविध भागांतील शेतकरी व युवक याप्रसंगी उपस्थित होते.
सध्या थंडीच्या दिवसांत तर शेतक:यांची मोठय़ा प्रमाणात तारांबळ होत आहे. पूर्व पुरंदरच्या नायगावसारख्या काही ठिकाणी तर अनेक दिवसांपासून वायरमनच उपलब्ध नाही. लाईटमनच
वायरमनचे काम करीत आहे, तर काही ठिकाणी चार-चार दिवस या कर्मचा:यांना बिघाड दुरुस्त होत
नाही.
अधिकारी फोन उचलत नाहीत. एकंदरीत पाणी असूनही विजेअभावी शेतक:यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी याबाबत काँग्रेस कमिटी व युवानेते संजय जगताप यांच्याकडे तक्रारी घेऊन येत आहेत. विद्युत पुरवठय़ात सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसच्या वतीने देण्यात आला आहे.
(वार्ताहर)
4पुरंदर तालुका हा दुष्काळी म्हणून ओळखला जातो. पावसाच्या लहरीपणावर येथील शेतकरी शेती व पिकांचे नियोजन करतो. यंदा बहुतांशी भागांत खरिपानंतर चांगला पाऊस पडला.
4विहिरी व ओढय़ांना अजूनही पाणी आहे. शेतक:यांची गहू, ज्वारी, हरभरा यांसह भाजीपाल्याची पिके जोमात आहेत. मात्न, पाणी उपलब्ध असूनही केवळ विजेअभावी शेतातील उभी पिके शेतक:यांच्या डोळ्यांसमोर जळू लागली आहेत.
4काही ठिकाणी सहा तास तर काही ठिकाणी चार तासही विद्युतपुरवठा होत नाही. त्यात वारंवार विजेचा लपंडाव सुरू असतो.
4त्यातच पुरेशा दाबाने वीजपुरवठा होत नाही. त्यामुळे शेतकरी शेतात तर त्यांच्या घरची महिला विहिरीवर रात्नंदिवस बसून राहत आहे.