शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
2
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
3
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
4
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
5
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
6
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
7
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
8
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
9
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
10
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
11
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
12
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
13
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
14
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
15
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
16
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
17
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
18
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा
19
११ वर्षांच्या मुलीने असा लावला नेपाळमधील ओली सरकारला सुरुंग, तो अपघात घडला आणि....
20
Urban Company IPO लाँच, जबरदस्त ग्रोथ आणि अधिक मूल्यांकन; काय आहे अधिक माहिती, गुंतवणूक करावी का? 

घागरभर पाण्यासाठी विहिरीत बुडताना मायलेकाला वाचवले

By admin | Updated: March 4, 2016 00:57 IST

पिंंपरी येथील घटना : मुलाला वाचविण्यासाठी आईनेही घेतली उडी

कोरेगाव : कण्हेर प्रकल्पामुळे पुनर्वसित झालेल्या पिंंपरी, ता. कोरेगाव येथे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जटील बनला आहे. घागरभर पाण्यासाठी ग्रामस्थांची वणवण सुरु असताना गुरुवारी सकाळी विहिरीतून पाणी आणताना दहा वर्षांचा मुलगा पडला. त्याला वाचविण्यासाठी आईने उडी टाकली आणि विहिरीच्या कठड्यावर बसलेली मुलगी ओरडल्याने आजूबाजूच्या लोकांनी बुडणाऱ्या मायलेकाला वाचविले. याबाबत अधिक माहिती अशी, की कण्हेर प्रकल्पामुळे बाधित झालेल्या पिंंपरी गावाचे रहिमतपूरपासून काही अंतरावर पुनर्वसन झाले आहे. ग्रामस्थांना येथे स्वतंत्र गावठाण अद्याप मंजूर झालेले नाही. आमदारांपासून मंत्रालयापर्यंत अनेकदा हेलपाटे मारुनही प्रशासकीय विभागांचे नाहरकतीचे दाखले गोळा करण्यात ग्रामस्थांची दमछाक झाली आहे. नगररचना विभागाच्या ना हरकतीसाठी ग्रामस्थ वाट पाहत आहेत. गेल्या २० वर्षांपासून ग्रामस्थांशी फरफट सुरु असताना घागरभर पाण्यासाठी गुरुवारी संध्या अर्जुन मर्ढेकर या दहा वर्षांचा मुलगा व सहा वर्षाच्या मुलीसह शेतातील एका विहिरीवर सकाळी गेल्या होत्या. अचानक मुलाचा तोल गेल्याने तो विहिरीत पडला, त्याला वाचविण्यासाठी आईने विहिरीत उडी टाकली. दोघे बुडणार एवढ्यात विहिरीच्या कठड्यावर बसलेली मुलगी ओरडल्याने आजूबाजूच्या लोकांनी विहिरीकडे धाव घेतली. महादेव फडतरे या तरुणाने प्रसंगावधान राखत विहिरीत उडी टाकून मायलेकाला वाचवले. गावात घटनेची माहिती समजताच ग्रामस्थ गोळा झाले. (प्रतिनिधी)आमच्या मरणयातना संपणार कधी...महाराष्ट्राच्या विकासामध्ये मैलाचा दगड ठरलेल्या कण्हेर प्रकल्पामुळे आम्हाला विस्थापित व्हावे लागले. या प्रकल्पाचा लाभ अनेकजण घेत असतील, पण त्यासाठी आमच्या झालेल्या अन्यायाबाबत कुणीच काही बोलत नाही. प्रशासनाने आमचा कसलाही विचार न करता रहिमतपूरजवळ माळावर पुनर्वसन केले. पुनर्वसन म्हणजे केवळ त्या ठिकाणी पाठविले. त्याठिकाणी आम्हाला धड निवारा दिलेला नाही. आमच्या गावठाणाचा प्रश्न शासनदरबारी अद्याप प्रलंबित आहे. आज आमच्या मायलेकांचा केवळ नशीब बलवत्तर म्हणून जीव वाचला, अन्यथा पाण्यासाठी आमच्यातील दोघे गमावले असते. प्रशासनाने आता तरी आमच्या मागण्यांकडे लक्ष द्यावे आणि आमच्या मरणयातना कधी संपतील, हे एकदाचे सांगावे, अशी संतप्त भावना मारुती मर्ढेकर यांनी व्यक्त केली.