शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ‘कृषी समृद्धी’ योजना राबविणार ; जुन्या योजनेत गैरप्रकार, नवी पीकविमा योजना लागू 
2
आजचे राशीभविष्य, १६ जुलै २०२५: 'या' राशीच्या लोकांना नशिबाची साथ लाभून अचानक धनलाभ होईल
3
पहलगाममध्ये २६ जणांना ठार मारल्यानंतर दहशतवाद्यांनी हवेत गोळीबार करून आनंद साजरा केला, प्रत्यक्षदर्शीने केला मोठा खुलासा
4
संपादकीय: बहिणींसाठी भावांना चुना; सरकारला पैसा हवा, मद्यावर कर वाढवला...
5
नाही-नाही करत अखेर जयंत पाटील यांचा राजीनामा; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष
6
वेलकम बॅक शुभांशू... चारही अंतराळवीरांचे पृथ्वीवर सुखरूप आगमन
7
बिस्किटांच्या बॉक्समधून ६० कोटींच्या कोकेनची तस्करी; भारतीय महिलेला अटक
8
खासदारांचे बाष्पस्नान, ‘हॉट स्टोन’ मालिश आणि ‘डीटॉक्स’
9
धक्कादायक! एक कोटी १२ लाख एसआयपी बंद म्हणजे बंदच...; का पैसे काढून घेतायत लोक...
10
दिलासा देणारी बातमी...! वर्षाला ५ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्यांच्या कमाईत वाढ
11
झोपडपट्टी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून गदारो‌ळ, मंत्री देसाई अन् ठाकरे-सरदेसाईंमध्ये खडाजंगी
12
आर्थिक गंडा घातल्यास दंडही वाढेल अन् वसुलीही होईल; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत घोषणा
13
२०२९ चा ‘मुहूर्त’ धरून ‘तुलसी’ का परत येते आहे?
14
भाजप आमदारांची मागणी भाजपच्याच मंत्र्यांनी लावली धुडकावून; बाजार समितीवरून झाला खेळ...
15
२३ वर्षांपूर्वीच्या कांदा धोरण समितीच्या अहवालाचे काय?
16
बोगस डॉक्टर, पॅथलॅबप्रकरणी कायद्यासाठी लवकरच समिती; नगरविकास राज्यमंत्री  मिसाळ यांची घोषणा
17
कुत्र्यांना तुमच्या घरी का खाऊ घालत नाही? याचिकाकर्त्याला सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
18
अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे चिखलफेक करणे नव्हे : कोर्ट
19
सावत्र बापाने घात केला, बेपत्ता चिमुरडीचा मृतदेह सापडला ससून डाॅक समुद्रात 
20
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!

मावळत्या सूर्या, लाडक्या कविवर्या... निरोप तुज देता!

By admin | Updated: January 2, 2016 08:28 IST

उत्साहाला गहिवर : नववर्षाचं स्वागत करताना कानाकानात, मनामनात रुंजी घालत राहिली मंगेश पाडगावकरांची जीवनगाणी

राजीव मुळये --सातारासंवेदनशील मनाचा जीवनासक्त कोनाडा प्रकाशमान करणारी पणती दोन वर्षांच्या संगमापाशी विझून गेली आणि काळजाचा ठोका चुकला. मृत्यू अटळ, वयसुलभ तरी न झेपणारा; न सोसणारा. एखाद्या लाडक्याच्या जाण्यानं घायाळ झालेल्या काळजांवर फुंकर घालायला पूर्वी ‘आकाशवाणी’ हेच एकमेव माध्यम होतं. त्या जमान्यापासून अनेक पिढ्यांच्या बोटाला धरून ज्यानं चालायला शिकवलं, त्या कलंदराच्या मृत्यूमुळं आज सोशल मीडियाही जेव्हा जखमी होतो, तेव्हा जाणवतं... काळाचं बंधन नसलेल्या शब्दांचा निर्माता काळाच्या पडद्याआड जाण्यानं प्रत्यक्ष काळही थबकतो.‘अनंत मरणे झेलून घ्यावी इथल्या जगण्यासाठी’ अशा शब्दांत जीवनाचं मूल्य ज्यांनी आम्हाला सांगितलं, त्या कविवर्य मंगेश पाडगावकरांनी तीस डिसेंबरला इहलोकीची यात्रा संपवली, तेव्हा नववर्षाचं स्वागत करण्याचा मूड होता. व्हॉट््सअ‍ॅप, फेसबुकनेही मावळतीचा गुलाबी रंग धारण करून स्वप्नरंजन सुरू केलं होतं. नववर्षाच्या ‘अ‍ॅडव्हान्स’ शुभेच्छा देणाऱ्यांनी नवीकोरी डिझाइन्स पाठवायला सुरुवातही केली होती. सातारकरांचे अनेक ग्रुप्स कास की ठोसेघर, कण्हेर की उरमोडी, अशा नियोजनात गुंतले होते. पोटापाण्यासाठी पुण्या-मुंबईत स्थायिक झालेले सातारकर तरुण स्थानिक मित्रांना ‘मी येतोय बरं का,’ असं सांगत होते... आणि अचानक सगळं थांबलं!नववर्षाचा पहिला किरण पाडगावकरांच्या त्या चिरपरिचित जाड भिंगांच्या चष्म्यावर पडणारच नाही, या कल्पनेनं समाजमन आणि त्यामुळं समाजमाध्यमंंही कोमेजून गेली. तीस तारखेला सकाळपासूनच पाडगावकरांच्या गाण्यांचे आॅडिओ शेअर केले जाऊ लागले. भल्या सकाळी ‘नीज माझ्या नंदलाला...’ ही अंगाई पाडगावकरांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर ऐकताना अनेकांना कसनुसं झालं. ‘भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी’ ऐकताना, तब्बल ८६ वर्षे पाहून डोळे मिटलेल्या या कवीच्या जाण्याने ‘अर्ध्यावरती डाव मोडल्या’ची जाणीव होणं हीच त्याची थोरवी! सगळ्यांचं ‘सेम’ असणारं प्रेम कुणाची बोटं झरझरा टाइप करू लागली, तर कुणाच्या की-पॅडवर उतरू लागला मुखोद््गत असलेला पाडगावकरी ‘सलाम’. या विस्तीर्ण काव्यपटाला उजाळा दिल्यानंतरच सोशल मीडिया नववर्षाच्या स्वागताकडे वळला.... नाइलाजानं; कारण काळ थांबणार नव्हता. कॅलेंडर बदलावंच लागणार होतं. सोशल मीडियावरून दृकश्राव्य आणि शाब्दिक शुभेच्छा इतक्या भरभरून वाहिल्या की, कॅलेंडर बदललं तरी खिळा तोच राहिलाय हेही लक्षात येऊ नये!नमुनेदार कोकणी शुभेच्छा गेल्या वर्सात हातून काय बरा वाईट झाला असात ता पोटात घाल. ह्या सर्व लेकरा बाळांका येणारा वरीस सुखाचा समृद्धीचा भरभराटीचा जाऊ दे रे महाराजा. जी काय बाहेरची भुतुरची इडा पीडा असात तिचा वाटोळा कर व लेकरा बाळांका सुखी ठेव रे महाराजा!