शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

उत्तरमांड नदीला जलपर्णीने घेरले

By admin | Updated: November 18, 2014 23:34 IST

चाफळमधील स्थिती : अनेक ठिकाणी पाणी साठल्याने धोका

चाफळ : येथील राम मंदिराच्या दक्षिणेकडील ऐतिहासिक घाटावरून वाहणाऱ्या उत्तरमांड नदीला जलपर्णीने वेढा घातला आहे. त्यामुळे नदीचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे.महाराष्ट्रकवी यशवंत तथा य. दि. पेंढारकर यांनी या उत्तरमांड नदीवर चिरकाल टिकणारे काव्य करून संपूर्ण महाराष्ट्रभर या नदीची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. असे ऐतिहासिक महत्त्व लाभलेल्या या उत्तरमांड नदीचा श्वास सध्या या जलपर्णीच्या विळख्याने अक्षरश: गुदमरला आहे. पश्चिमेच्या उंच डोंगरकपारीतून उगम पावलेल्या या नदीचे यापूर्वी विशाल रूप होते. या नदीवर पुरातन ब्रिटिशकालीन असलेला ३५ फुटी उंचीचा पादचारी पूल आजही इतिहासाची साक्ष देत दिमाखात उभा आहे. पुलाच्या पूर्वेकडील बाजूस गावात सध्या ये-जा करण्यास ७ फूट उंचीचा दुसरा फरशी पूल आहे. यावरूनच सध्या रहदारी सुरु असते. पावसाळ्यात दुथडी भरून वाहणाऱ्या या नदीवरच कृष्णा खोरे महामंडळाने गमेवाडीनजीक उत्तरमांड मध्यम प्रकल्प उभारला आहे. यामुळे नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह सध्या कमी झाला आहे. गेल्या पाच वर्षांत सत्तेवर असणाऱ्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राम मंदिरास तीथक्षेत्राचा दर्जा मिळवून दिला. मंदिर व परिसरात सुशोभीकरणाची अनेक कामे मार्र्गी लावली. पर्यटनाच्या माध्यमातून मिळणाऱ्या निधीतून उत्तरमांड नदीच्या दोन्ही बाजूस सुसज्ज घाट बांधण्याचे काम प्रस्तावित होते. ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर होऊन ती आता आमदार शंभुराज देसाई गटाकडे गेली आहे. विद्यमान सदस्यांनी प्रस्तावित घाट बांधकामासाठी पाठपुरावा करण्याची गरज आहे. तसेच नदीला जलपर्णीपासून मुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्याची अपेक्षा ग्रामस्थांतून व्यक्त केली जात आहे. (वार्ताहर)ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातनदीपात्राच्या दोन्ही बाजूला गारवेल व इतर जलपर्णीनी वेढा घातला आहे. पाण्याचा खळखळाट सध्या बंद झाल्याने पाण्याचा दुर्गंधीयुक्त साठा झाला आहे. त्यातच ग्रामस्थ, व्यावसायिक केर-कचऱ्यासह प्रदूषण निर्माण करणाऱ्या वस्तू नदीपात्रात टाकत असल्याने पाणी दूषित बनत चालले आहे. नदीपात्रालगतच गावाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारी विहीर आहे. नदीतील दुर्गंधीयुक्त पाणी विहिरीत गेल्यास ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. चाफळच्या राम देवस्थान क्षेत्राला ब वर्ग दर्जा मिळाला आहे. त्यामुळे शासनाकडून दरवर्षी दोन कोटी रूपयांचा निधी मंदिर ट्रस्टला दिला जातो. उत्तरमांड नदीला जलपर्णीपासून मुक्त करण्यासाठी ट्रस्टने पुढाकार घ्यायला हवा. शासनाकडून मिळणाऱ्या निधीतून ट्रस्टने जलपर्णी काढण्यासाठी प्रयत्न करावेत.- अंकुश जमदाडे, उपसरपंच, चाफळ