शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

सुरेश आवटी यांचे नगरसेवकपद रद्द

By admin | Updated: February 23, 2016 00:41 IST

न्यायालयाचा निकाल : महापालिकेवर केलेली दगडफेक भोवली

सांगली : स्थायी समिती माजी सभापती व काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश आवटी यांना नगरसेवक म्हणून अपात्र ठरविल्याचा निकाल सोमवारी दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर बी. एस. गारे यांनी दिला. २००८ मधील मोर्चावेळी महापालिकेवर केलेल्या दगडफेकीत आवटी यांना दोन वर्षांची शिक्षा झाली होती. या शिक्षेला स्थगिती नसताना त्यांनी निवडणूक लढविली होती. त्याविरोधात प्रभागातील पराभूत उमेदवार आबा पाटील व मिरजेतील मतदार सलीम शेख यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. महापालिकेच्या २०१३ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत मिरजेतील प्रभाग क्रमांक ९ (ब) मधून काँग्रेसचे उमेदवार म्हणून आवटी विजयी झाले होते. आवटी यांना मिरज कार्यालयावरील दगडफेकप्रकरणी २०११ मध्ये मिरजेतील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी दोन वर्षे दहा महिन्यांची शिक्षा सुनावली होती. उमेदवारी अर्ज छाननीवेळी कुणीही त्यांच्या अर्जाबाबत हरकत घेतली नव्हती. त्यामुळे ते निवडणुकीस पात्र ठरले. त्यानंतर निवडूनही आले. छाननीवेळी त्यांच्या शिक्षेला स्थगिती नव्हती. त्यामुळे याच मुद्द्यावर या प्रभागातील पराभूत उमेदवार आबा पाटील यांनी याचिका दाखल केली होती. निवडणूक प्रतिज्ञापत्रातील शिक्षेची माहिती लपविण्यात आली आहे. मिरज न्यायालयाने नैतिक अध:पतन झाल्याचे ताशेरे ओढत, आवटी यांच्यासह अन्य काही लोकांना शिक्षा सुनावली होती. निकालपत्रात आवटी व इतर महापालिकेचे नगरसेवक विश्वस्त असताना, त्यांनी मालमत्तेचे नुकसान केले, ते नैतिक अध:पतनच असल्याचे नमूद केले होते. महाराष्ट्र महापालिका कायदा कलम १० (१) अ नुसार न्यायालयाने नैतिक अध:पतनाखाली एखाद्याला शिक्षा सुनावली असेल, तर त्याला निवडणूक लढविता येत नाही, ते निवडणुकीसाठी अपात्र ठरतात, अशी तरतूद आहे. त्याचे दाखले न्यायालयात सादर करण्यात आले. मैनुद्दीन बागवान यांच्याप्रकरणी झालेल्या निकालाचाही दाखला देण्यात आला. आवटी यांनी शिक्षेनंतर येथील जिल्हा न्यायालयात अपील केले होते. त्यावेळी शिक्षेला स्थगितीची मागणी केली नव्हती. त्यांची शिक्षा निलंबित ठरविण्यात आली होती. त्यामुळे छाननीवेळी ते अपात्रच होते, हा मुद्दा याचिकाकर्त्यांचे वकील एस. एस. शेठ यांनी मांडला. निवडणूक झाल्यानंतर त्यांच्या शिक्षेला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. त्यामुळे छाननीवेळच्या परिस्थितीचा विचार करून न्यायालयाने हा निकाल दिला. त्याविरोधात जिल्हा न्यायालयातच आवटी यांनी स्थगितीची मागणी करून अपिलात जाण्यासाठी मुदतीची मागणी केली आहे. याचिकाकर्त्यांनी या मागणीवर आक्षेप नोंदविला आहे. तांत्रिक मुद्दा चर्चेत महापालिका कायद्यातील तरतुदीनुसार नैतिक अध:पतनाच्या मुद्द्याखाली सहा वर्षे संबंधितास अपात्र ठरविण्याची तरतूद आहे. प्रत्यक्षात आता आवटी यांच्या अपात्रतेची मुदत कोणत्या तारखेपासून धरली जाणार, यावरून आता चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे हा एक तांत्रिक वादाचा मुद्दा ठरू शकतो. तीन नगरसेवक अपात्र गेल्या तीन महिन्यांत नगरसेवक अपात्र ठरण्याच्या तीन घटना घडल्या. यामध्ये माजी महापौर राष्ट्रवादीचे नगरसेवक मैनुद्दीन बागवान, काँग्रेस नगरसेविका आयेशा नायकवडी आणि आता सुरेश आवटी यांचा यामध्ये समावेश आहे. आवटी व बागवान यांची प्रकरणे जवळपास एकच आहेत. नायकवडी यांच्या अपात्रतेचा संबंध जातीच्या दाखल्यासंदर्भात होता.