शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस अधीक्षक कऱ्हाडात तळ ठोकून

By admin | Updated: July 28, 2015 22:05 IST

प्रचंड फौजफाटा : छापासत्रातून ‘अ‍ॅक्शन प्लॅन’चा पहिला टप्पा कार्यान्वित

कऱ्हाड : शहरातील टोळीयुद्ध आणि बबलू माने खून प्रकरणात पोलिसांनी कुख्यात गुंड सलीम शेख ऊर्फ सल्या चेप्या याच्या टोळीभोवतीचा फास आवळण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी पोलिसांनी सल्यासह पाचजणांच्या घरावर छापे टाकले. शहरात अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख हे मंगळवारी दिवसभर कऱ्हाडात तळ ठोकून होते. शहरात पहाटेपासूनच राबविलेल्या विशेष मोहिमेत पोलीस उपअधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर, पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, राजेंद्र राजमाने, एस. के. म्हेत्रे, वडूजचे पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव, फलटणचे निरीक्षक अण्णासाहेब घोलप, दहिवडीचे सहायक पोलीस निरीक्षक युवराज हंडे, वाठार स्टेशनचे सहायक निरीक्षक शहाजी निकम, कऱ्हाड तालुका पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक विवेक पाटील व सहायक निरीक्षक समाधान चौरे यांच्यासह कर्मचारी सहभागी झाले होते. कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यातून मंगळवारी पहाटे शहर व तालुका पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना तातडीने बोलावून घेण्यात आले. पहाटे एकाचवेळी सर्व पथके बंदोबस्तासाठी व छापासत्रासाठी रवाना झाली. त्यानंतर एकाचवेळी सर्व ठिकाणी छापे टाकण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. टोळी युद्धानंतर कऱ्हाडातील गुन्हेगारी टोळ्यांचे वाढते प्रस्थ अधोरेखित झाले. या टोळ्यांचे कंबरडे मोडण्याचे आव्हान सध्या पोलिसांसमोर आहे. ही संघटित गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार करणार असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते. मंगळवारचे छापासत्र हा या ‘अ‍ॅक्शन प्लॅन’चा पहिला टप्पा मानला जातो. (प्रतिनिधी)पोलीस पथके कऱ्हाडबाहेरील !कऱ्हाडात ज्या पथकांनी पाच घरांवर प्रत्यक्ष छापा टाकला, ती पोलीस पथके कऱ्हाडबाहेरील होती. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास या पाच पथकांनी वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून संशयितांना स्थानबद्ध केले. तसेच त्यांच्या घरांची कसून झडती घेतली. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. अभिनव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली नेमण्यात आलेल्या या पथकांमध्ये प्रत्येक पथकात एक अधिकारी व सहा पुरुष कर्मचारी तर दोन महिला पोलिसांचा समावेश होता. आणखी आरोपींचा सहभाग स्पष्टबबलू मानेच्या खून प्रकरणात सोमवारी पहाटे पोलिसांनी फिरोज बशीर कागदी (वय ३३, रा. शिंदे गल्ली, शनिवार पेठ, कऱ्हाड) याला अटक केली आहे. त्यानंतर मंगळवारी पहाटे ठिकठिकाणी छापे टाकून तिघांना अटक केली. या प्रकरणात आणखीही आरोपी निष्पन्न होणार असून, त्यादृष्टीने पोलीस तपास सुरू असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितले. तालुक्यात अफवांना ऊतगत आठवड्यापासून कऱ्हाडात तणावपूर्ण शांतता आहे. अशातच मंगळवारी पोलिसांनी सर्व ताकदीनिशी छापासत्र चालविले. ठिकठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला. पहाटेपासून पोलिसांच्या सुरू असलेल्या या हालचालींची माहिती सोशल मीडियाद्वारे पसरली. त्यामुळे तालुक्यात अफवांना ऊत आला होता. वेगवेगळ्या चर्चाही रंगत होत्या. तिघांनाही पाच दिवस कोठडीकऱ्हाड पोलिसांनी मंगळवारी अटक केलेल्या इब्राहिम सय्यद, जावेद शेख व मोहसिन जमादार या तिघांना दुपारी पोलिसांनी न्यायालयात हजर केले. तिघांनाही न्यायालयाने पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. सोमवारी अटक केलेल्या फिरोज कागदी यालाही दि. १ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.बारा तास पोलिसांची तपासणीपोलिसांनी सल्यासह पाचजणांच्या घरावर छापा टाकला. सुमारे बारा तास ही तपासणी सुरू होती. पोलिसांनी शस्त्रास्त्रे, रोख रक्कम, शिधापत्रिका, बँक खाते, मालमत्ताविषयक कागदपत्रे, मोबाइल सीमकार्ड, वाहनांची कागदपत्रे आदींची तपासणी यावेळी करण्यात आली.