शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

सुपर स्ट्रक्चर स्टॉल उभारणीस प्रारंभ

By admin | Updated: January 3, 2016 00:49 IST

तयारी अंतिम टप्प्यात : ७ जानेवारीपासून राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन

पुसेगाव : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सेवागिरी महाराजांची यात्रा ही शेतकऱ्यांची यात्रा म्हणून सर्व प्रसिद्ध आहे. श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने दि. ७ ते ११ जानेवारी या कालावधीत पुसेगाव येथे राज्यस्तरीय सेवागिरी कृषी व पशुपक्षी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे सुपर स्ट्रक्चर स्टॉल उभारणीस श्री सेवागिरी देवस्थानचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, विश्वस्त मोहनराव जाधव, पश्चिम महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शंकरराव गोडसे, बापूराव जाधव, रुपेश कोळेकर, कट्टे आदी उपस्थित होते. सुरेश जाधव म्हणाले, ‘या प्रदर्शनात मुख्यत: कोरडवाहू शेतीचा विकास करण्याच्या दृष्टीने शेती व शेतीपूरक व्यवसाय, दुग्धव्यवसाय, रेशीम उद्योग, कुक्कटपालन, मत्स्य व्यवसायासोबतच कोरडवाहू शेतीसाठी उपयुक्त यांत्रिकीकरण, शेतमाल प्रक्रिया आदींवर विशेष भर देण्यात येणार आहे. यंदाच्या कृषी प्रदर्शनात नवनवीन तंत्रज्ञान, खते, औषधे, अवजार, यंत्रसामूग्रीसह इतर नामांकित कंपन्याचे सुमारे तीनशे स्टॉल्स मांडण्यात येणार आहेत. शेतीचा बदलता चेहरा, यांत्रिकीकरण, पीक पद्धतीतील नवनवे बदल, खत आणि पाणी व्यवस्थापनातील बदल, ऋतुमानानुसार निर्माण झालेली आव्हाने, शेती मालाची बाजारपेठ, प्रक्रिया उद्योग या सर्व क्षेत्रांचे अंतरंग उलगडून दाखविणारे कृषी प्रदर्शन असेल. जगभरातील बदल आणि जिल्ह्यातील शेतीच्या स्थितीची अभ्यास करून विविध कंपन्या शेतकऱ्यांना भेटतात. त्यांच्याशी संवाद साधतात, शेतीसमोरील समस्यांची माहिती शेतकरी तज्ज्ञासमोर मांडतो, त्यांच्याकडून उत्तर मिळवतो आणि शेतात जाऊन प्रयोग करतो. युवक प्रयोगशील शेतात करिअर करू पाहत आहेत. त्यांच्यासाठी प्रदर्शन एक पर्वणीच असेल. शेती विकासाच्या वाटेवर प्रदर्शन मार्गदर्शकाची भूमिका बजावते. त्यांच्यात कंपनीचा सहभाग म्हणजे लाखो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याची संधीच आहे. त्यासाठी या कृषी व पशुपक्षी प्रदर्शनाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा,’ असे आवाहन यावेळी जाधव यांनी केले. (प्रतिनिधी)